मारोती जुंबडे परभणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील एका मतदान केंद्रावर शनिवारी सकाळी महंत राधाकृष्ण स्वामी व मतदान केंद्र अधिकारी यांच्यात वाद झाल्याची घटना घडली.
माहितीनुसार, महंत राधाकृष्ण स्वामी मतदानासाठी संबंधित केंद्रावर गेले असता अधिकाऱ्यांनी त्यांना ओळख पटविण्यासाठी अधिकृत ओळखपत्र सादर करण्यास सांगितले. आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यांपैकी कोणताही वैध पुरावा दाखविण्याची सूचना करण्यात आली. मात्र, त्यांच्या जवळ प्रत्यक्ष ओळखपत्र नसल्याने त्यांनी मोबाईलमधील छायाचित्र दाखविण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास मनाई असून, मोबाईलमधील छायाचित्र ग्राह्य धरता येत नसल्याने अधिकाऱ्यांनी मतदानास परवानगी नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या महंत स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचा आरोप करत आपल्याला मतदानापासून रोखण्यात येत असल्याचा दावा केला. काही काळ मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
नियमांचे पालन करणे आवश्यक दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले की, मतदानासाठी आयोगाने निर्धारित केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणताही वैध पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याने आवश्यक कागदपत्रांशिवाय मतदानास परवानगी देता येत नाही.
Web Summary : A dispute arose at a Parbhani polling booth when officials asked Mahant Radhakrishna Swami for valid ID, denying vote due to lacking it. Tensions eased after staff intervention.
Web Summary : परभणी में मतदान केंद्र पर महंत राधाकृष्ण स्वामी से पहचान पत्र मांगा गया, न होने पर वोट देने से मना किया। कर्मचारियों ने तनाव कम किया।