शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: येलदरी धरण तुडुंब भरले, सर्व दहा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:43 IST

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने येलदरी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक येत आहे.

- प्रशांत मुळीयेलदरी वसाहत (परभणी): जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे तर दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या दहा दरवाज्यातून सोमवारी सकाळी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी दुपारी दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात होता यानंतर पाण्याची आवक धरणाच्या साठ्यात वाढल्यामुळे रात्री साडेनऊ वाजता चार दरवाज्यातून हा विसर्ग सुरू होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे सुद्धा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील विविध मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येलदरी धरण सोमवारी पहाटे 100 टक्क्यांवर पोहचले. त्यामुळे प्रशासनाने विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. धरणाचे सर्व दहा वक्रद्वारे सोमवारी सकाळी 7 वाजता अर्ध्या मीटरने, 9.30 वाजता 1 मीटरने तर दुपारी बारा वाजता  गेट क्र.1,3,5,6,8 व 10  हे 1.5 मीटरने आणि गेट क्र. 2,3,4,7, व 9 हे 1 मीटरने चालू राहणार आहेत. यातून तब्बल 53 हजार 360 क्युसेक इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तर येलदरी वीज निर्मिती केंद्राच्या तीन विद्युत जनित्रातून 2700 कुसेक्स विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात सुरू आहे. दरम्यान, नदी काठच्या गावांना जल संपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी, जनावरे व शेती उपयोगी साहित्य नदी पात्रापासून लांब काढून ठेवावे, असे आवाहन येलदरी धरण प्रशासनाने केले आहे.

मुसळधार पावसाने आवक वाढलीवाढती आवक लक्षात घेऊन आणि पूर नियंत्रणासाठी 15 ऑगस्ट रोजी येलदरी धरणातून येथील वीज निर्मिती केंद्राच्या दोन जनित्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत गेली. रविवारी धरणात 97 टक्के पाणीसाठा झाला. यामुळे जलविद्युत केंद्राचे तीन युनिट सोडल्यानंतर रविवारी सायंकाळी धरणाचे सुरवातीला दोन तर रात्री चार दरवाजे उघडले होते. मात्र पांडूक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने  प्रशासनाने धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. 

पूर्णा प्रकल्पाचे तीनही धरणे तुडूंबमराठवाड्यात पूर्णा नदीवर तीन धरणे बांधण्यात आलेली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण, परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण ही तीनही धरणे यंदा दमदार पावसाने शंभर टक्के भरली आहेत. या तीनही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आलेला आहे.

विदर्भ-मराठवाडा रस्ता बंद होण्याची शक्यताधरणाच्या पाणलोट क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने येलदरी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक येत आहे. यामुळे धरणातून होणारा विसर्ग वाढविण्यात येण्याची माहिती आहे. विसर्ग वाढला तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या येलदरी धरणाजवळील पुलावरून पाणी जाऊन रस्ता बंद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसfloodपूर