शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी परभणीत महिलांचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:42 IST

जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आज सकाळी महिलांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

परभणी : जिल्ह्याला शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आज सकाळी महिलांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.

शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयासाठी खा.बंडू जाधव यांनी परभणीत आंदोलन उभे केले आहे. या अंतर्गत शुक्रवारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी उचलून धरली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकाळी ११ वाजेपासून महिला एकत्र आल्या. यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, कॉ.माधुरी क्षीरसागर, डॉ.मीनाताई परतानी, डॉ.संध्याताई दुधगावकर, आधार कामगार युनियनच्या अनिता सरोदे, लायन्स क्लबच्या प्रभावती अन्नपूर्वे, हेमाताई रसाळ, श्रृती जोशी, वर्षा चव्हाण, सरोज देशपांडे, लताबाई परभणे, परिचारिका मेघना देशमुख, विमल काकडे, विद्यार्थिनी कोमल विश्वब्रह्मा आदींनी उपस्थित महिलांसमोर मनोगत व्यक्त केले.

परभणी जिल्ह्यात कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. शासकीय रुग्णालयासाठी सर्व सुविधा उपलब्ध असताना तसेच या ठिकाणी महापालिका अस्तित्वात असताना वैद्यकीय महाविद्यालयासाठी जाणून बुजून डावलल्या जात आहे. परभणीकरांना आंदोलनाशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे या महाविद्यालय मंजूर होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. त्यानंतर महिला प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

वैद्यकीय महाविद्यालयाचा लढा तीव्र करणार : खा.बंडू जाधव परभणी येथे सर्व सुविधा आणि महापालिका असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का डावलले? असा सवाल करीत शासनाने त्याचा खुलासा करावा व वैद्यकीय महाविद्यालयास त्वरीत मंजुरी द्यावी, अशी मागणी खा.बंडू जाधव यांनी केली. वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास परभणीतील नागरिकांच्या आरोग्यासह शिक्षणाचाही प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करुन घेण्यासाठी उभारलेला हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :agitationआंदोलनparabhaniपरभणीMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयEducationशिक्षण