शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

बेकायदेशीररित्या संस्था ताब्यात घेऊन फसवणूक प्रकरणात एका विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 14:38 IST

जिल्हा रुग्णालय परिसरातील मॉडेल इंग्लिश सोसायटीवर जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत

ठळक मुद्देमॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी प्रकरणनिखील जैन यांच्याविरुद्ध गुन्हा

परभणी : अधिकार नसतानाही बेकायदेशीररित्या संस्था ताब्यात घेऊन संस्थेची अभिलेखे स्वत:जवळ बाळगली तसेच अनाधिकृतरित्या आर्थिक व्यवहार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी निखील जैन यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

येथील जिल्हा रुग्णालय परिसरातील मॉडेल इंग्लिश सोसायटीवर जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी या प्रशासकीय अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी या संस्थेची विशेष सभा घेण्याचे आदेश प्रशासकीय अधिकारी यांना दिले होते. त्यावरुन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन शिक्षण विभागातील अधीक्षक संतोष कठाळे यांनी ६ फेब्रुवारी रोजी मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात विशेष सभा घेतली. त्यावेळी अनियमियततेचे हे प्रकार समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन अधीक्षक संतोष गोपीनाथ कठाळे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार या सोसायटीचे सचिव हेमराज जैन यांच्या निधनानंतर अधिकार नसतानाही संस्थेच्या नावावर महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून आर्थिक व्यवहार सुरु ठेवले. तसेच ठराव बूक, आर्थिक अभिलेखे, कार्यकारी मंडळ सूचना रजिस्टर, सर्वसाधारण सभा सूचना रजिस्टर, सभासद नोंदवही, लेखा परीक्षण अहवाल, संस्थेचे मूळ नोंदणीपत्र, संस्थेची घटना, स्थावर व जंगम मालमत्ता रजिस्टर, बँकेचे पासबूक, चेकबूक, कर्मचाऱ्यांची नोंदवही, बिंदूनामावली नोंदवही, फेरफार रजिस्टर, शाळा मान्यतेचे आदेश आदी अभिलेखे स्वत:जवळ बाळगून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

ठरावाची पाने फाडलीसंतोष कठाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे की,६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या विशेष सभेत ठराव बुकातील काही पाने फाडलेली आढळली. त्याचप्रमाणे अभिलेखेही उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी कारणेदाखवा नोटीस बजावून ही अखिलेखे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करण्याचे सूचित केले होते. मात्र तेही दाखल केले नाहीत. तसेच अनाधिकृत कार्यकारी मंडळ स्थापन करुन स्वत: सचिव असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीparabhaniपरभणीEducation Sectorशिक्षण क्षेत्रPoliceपोलिसParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी