शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ओंकार गायकवाड अपहरण, खून प्रकरण; मुख्य आरोपीच्या पाठलाग करून मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:01 IST

ग्रामीण पोलिसांनी रात्री पाठलाग करुन यशस्वी केली धाडसी मोहीम

- रेवणअप्पा साळेगावकरसेलू  (परभणी) : संबर येथील युवक ओंकार गायकवाड यांच्या अपहरण आणि निर्घृण हत्येप्रकरणी शनिवार रात्री पासून फरार असलेल्या मुख्य आरोपी पप्पू वैद्य यास अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. गुरुवारी रात्री ११ वाजत पेडगाव शिवारात पाठलाग करीत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आधी पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता मुख्य आरोपीस अटक करून महत्त्वाचा टप्पा गाठण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणात बुधवारी परभणी ग्रामीण पोलिसांनी ३ व स्थागुशाचे पो.नि.विवेकानंद पाटील यांचे पथकाने २ अशा ५ आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली परभणी ग्रामीण पोलिसांनी मिळवलेल्या गुप्त माहिती आधारे पप्पू वैद्य हा पेडगाव शिवारात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने  गुरुवारी रात्री ११ वा पेडगाव शिवारात पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे,पो.ह.भाऊ जाधव ,देविदास बुकरे, लोणकर यांच्या पथकाने सापळा रचला. याचा सुगावा लागताच मुख्य आरोपी पप्पू वैद्यने पळ काढला. परंतु, पोलिस पथकाने पाठलाग करत काही अंतरावर त्याला पकडण्यात यश मिळवले. आरोपीस न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी दिली आहे.

आधी पाच आरोपी होते अटकेतआर्थिक व्यवहाराच्या कारणाने संबर येथून कारने अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी मोरेगाव शिवारातील कॅनालजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणातील गंभीरतेची दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत वैभव खेडेकर, भीमाशंकर वैद्य आणि नितीन काळे यांना अटक केली. तर स्थागुशा पथकाने हरिओम मोहिते, वेदांत पारवे यांना ताब्यात घेतले होते.

काय आहे प्रकरणशनिवारी रात्री १०:३० वाजता संबर येथून ओंकार गायकवाड याचे पप्पू वैद्य (रा. बोबडे टाकळी) व इतर अनोळखी तिघांनी कारमधून अपहरण केले.ओंकार, दिनकर गायकवाड आणि नातेवाईक अनिकेत साळवे हे चौफुलीवर बसले असताना पप्पू वैहाने तू पैसे का देत नाहीस? असे म्हणत जबरदस्तीने ऑकारला कारमध्ये बसवले.ओंकार आणि पप्पू वैद्य यांचा ट्रॅक्टरचा व्यवसाय होता. पप्पूने यापूर्वी ओंकारकडून ५२ हजार रुपये घेतले होते आणि पुन्हा पैशाची मागणी करत होता, अशी फिर्याद ऑकारचे वडील बन्सीधर गायकवाड यांनी परभणी ग्रामीण ठाण्यात दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणparabhaniपरभणी