शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: मृत्यू प्रमाणपत्रासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:31 IST

याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

परभणी : तक्रारदाराच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तिचे मृत्यू नोंद प्रमाणपत्र ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून घेतल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी याने काही दिवसांनी लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने मंगळवारी एसीबी पथकाकडे तक्रार अर्ज दिला. त्यावरून झालेल्या पडताळणी आणि कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराकडून एक हजाराची मागितलेली लाच रक्कम स्वीकारली.

ही सापळा कारवाई मानवत तालुक्यातील खरबा ग्रा.पं. येथे मंगळवारी झाली. रमेश रंगनाथराव मुळे, ग्रामपंचायत अधिकारी, खरबा, ग्रा.पं. असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. तक्रारदार यांची पत्नी हिचा २२ फेब्रुवारी २०२५ ला आजारादरम्यान मृत्यू झाला. त्याबाबत ग्रामपंचायत येथे नोंद करून ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे यांच्याकडून तक्रारदार यांनी २३ ऑक्टोबरला मृत्यू प्रमाणपत्र घेतले. ग्रामपंचायत अधिकारी मुळे यांनी मृत्यू नोंद घेऊन प्रमाणपत्र दिल्यामुळे तक्रारदारास पाचशे रुपयांची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांनी पाचशे रुपये रक्कम नाईलाजास्तव दिली. पुन्हा २८ ऑक्टोबरला ग्रामपंचायत अधिकारी मुळे यांनी तक्रारदार यांना फोन करून मृत्यू प्रमाणपत्र दिले म्हणून पुन्हा पाचशे रुपयाची मागणी केली.

ही रक्कम लाच असल्याने तक्रारदार यांनी चार नोव्हेंबरला एसीबी परभणी येथे तक्रार अर्ज दिला. त्यावरून पोलिस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्यासह पथकाने ग्रामपंचायत कार्यालय खरबा येथे पंचासह पडताळणी केली. दरम्यान, लोकसेवक रमेश मुळे याने तक्रारदाराकडे एक हजाराची लाचेची मागणी पंचासमक्ष केली. लाच रक्कम स्वीकारल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. सरकारी पक्षातर्फे पोलिस उपअधीक्षक महेश पाटणकर यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक मनीषा पवार करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Village officer caught accepting bribe for death certificate.

Web Summary : A village officer in Parbhani was caught red-handed accepting a ₹1,000 bribe for issuing a death certificate. He had previously extorted ₹500 for the same service. ACB laid the trap following a complaint.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी