शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची पाथरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:55 IST

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल होण्याची आठवड्यातील दुसरी घटना आहे.

- विठ्ठल भिसेपाथरी : पाथरी नगरपरिषद अंतर्गत साईबाबा विकास आराखडा  समितीमध्ये काम करणाऱ्या नगरपरिषदेच्या  एका कर्मचाऱ्यास माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयातच  बेदम मारहाण केल्याची घटना 17 मार्च रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात माजी आमदार दुर्राणी यांच्या सहा ते आठ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केला आणि इतर कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्राणी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल होण्याची आठवड्यातील दुसरी घटना आहे.

पाथरी येथील साईबाबा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मधुकर दिवाण काम पाहतात. त्यांच्याकडे मागील आठ महिन्यापासून सदाशिव अण्णासाहेब गायकवाड हे सहायक म्हणून काम करतात. 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सदाशिव गायकवाड हे नगरपरिषदमधील कार्यालयात शासकीय काम करत असताना माजी बाबाजानी दुर्राणी आणि इतर आठ जण दाखल झाले. यावेळी दुर्राणी म्हणाले की, ''सदाशिव गायकवाड तू कायको काम कर रहा है? दिवाण कहा है? इसको बहुत ज्यादा हो गया इसको मारो.'' असे म्हणत दुर्राणी यांनी सदाशिव गायकवाड यास तेथे असलेल्या लाकडी फळीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच इतर कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करत जीवे  मारण्याची धमकी दिली. दरम्यान, दुर्राणी हे मुख्याधिकारी यांच्या खुर्चीवर जाऊन बसले, त्यानंतर गायकवाड यांच्या कडील वसुलीची रक्कम 5 हजार 200 आणि 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला, अशी फिर्याद गायकवाड यांनी दिली आहे. 

यावरून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी ,शेहजाद बखतीयार खान,  शेख इरफान शेख रजाक,रेहान मगबूल खान दुरराणी , हमीद खान शेर खान, शेख नासिर शेख रौफ, अब्दुल  इब्राहिम अब्दुल रशीद अन्सारी, शेख अल्ताफ शेख मुल्लाक, यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि  विविध कलमा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, 

माजी लोकप्रतिनिधीची गुंडागिरीपाथरी नगरपरिषदेवर सध्या प्रशासक आहे नगरपरिषदचा कारभार प्रशासकमार्फत चालतो. मात्र एका माजी लोकप्रतिनिधींनी नगरपरिषद कार्यालयात येत कर्मचाऱ्यांना मारहाण करणे तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसणे ही बाब लोकशाहीला शोभा देणारी नाही. माजी लोकप्रतिनिधी गुंडगिरी करत आहेत याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.- तुकाराम कदम, मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी

नगरपरिषदेतील गाढवाची चर्चानगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना मारहाण घटना घडण्यापूर्वी नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरामध्ये काही गाढव आणण्यात आली होती. हे गाढव नेमकं कशासाठी आणली होती याचा उलगडा झाला नाही. मात्र, यावरून अधिकाऱ्यांची दिंड काढली जाणार असल्याची चर्चा परिसरात होती.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी