शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी'च्या मावेजासाठी शेतकरी आक्रमक; बैलगाडी आडवी लावून केले रस्तारोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 11:58 IST

सेलू ते देवगावफाटा रस्त्यावर चिकलठाणा पाटीवर अडवला रस्ता

- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (परभणी) : जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी जिल्हास्तरीय समितीच्या निर्णयानुसार भूसंपादन मावेजा मिळत नाही या कारणासाठी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज सोमवारी सकाळी १०. १५ वाजेता आक्रमक पवित्रा घेतला. सेलू ते देवगाव फाटा येथील चिकलठाणा पाटीवर बैलगाडी आडवी लावून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. 

समृद्धी महामार्गावर भूसंपादीत जमीन मावेजाच्या ९ जून २०२३ च्या अहवालास शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे जिल्हास्तरीय समीतीने हंगामी बागायती क्षेत्र ग्राह्य धरून मंजूर केलेला मावेजास शेतकऱ्यांनी संमती दिली. पण हा मावेजा शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही. या उलट जिल्हा प्रशासनाने १० जानेवारी २०२५ ला पत्र देऊन शेतकऱ्यांचा आक्षेप असलेल्या ९ जून २०२३ च्या अहवालानुसारच मावेजा देण्याचा प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश दिले. याला शेतकऱ्यांनी परत ९ जुन २०२३ च्या अहवालास विरोध करीत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल केली आहे. जिल्हास्तरीय समितीने यापूर्वी हंगामी बागायती क्षेत्र मंजूर केल्याप्रमाणे मावेजा तातडीने द्यावा,  अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आज सकाळी सेलू ते देवगाव फाटा येथे रस्तारोको आंदोलनास सुरुवात केली. आंदोलनाने या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प पडली आहे. 

दरम्यान, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी, दिपक टिप्परसे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, पो.नी दिपक बोरसे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. आंदोलकांनी लेखी स्वरूपात हमी मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात घेईल अशी भूमिका घेतली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनFarmerशेतकरी