शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:35 IST

पोलिसांनी संबंधित बसचा सेलू ते परभणी दरम्यान पाठलाग करत जुन्या जिल्हा परिषद समोर बस अडवली.

- विठ्ठल भिसेपाथरी (जि. परभणी): पाथरी ते सेलू रस्त्यावरील देवनांदरा शिवारात आज (मंगळवार) सकाळी ६ वाजता एका खासगी ट्रॅव्हल बसमधून नवजात बाळ बाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अर्भक ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित बसचा सेलू ते परभणी दरम्यान पाठलाग करत जुन्या जिल्हा परिषद समोर बस अडवली. त्यानंतर प्रवाशांची कसून चौकशी करून पोलिसांनी एका महिलेस आणि पुरुषाला ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही ‘संत प्रयाग’ खासगी ट्रॅव्हल बस पुण्याहून परभणीकडे येत होती. देवनांदरा शिवारात आल्यानंतर एका प्रवाशाने नवजात बाळ बाहेर फेकले. ही घटना एका नागरिकाच्या लक्षात आली आणि त्याने तातडीने पाथरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता, तो नवजात पुरुष बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बसचा माग काढत पोलिसांनी परभणीमध्ये बस थांबवून दोघांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ. लोखंडे, थोरे, वाघ, कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ट्रॅव्हल बसमध्येच झाली होती प्रसूती!पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रसूती ट्रॅव्हल बसमध्येच झाली होती. त्यामुळे घाबरून नवजात अर्भक बाहेर फेकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित महिला व पुरुष हे एकमेकांचे पती-पत्नी असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, दोघांनाही पाथरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची महिती पोलीस निरीक्षक लांडगे यांनी दिली. सध्या अधिक तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी