शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

Parabhani: हॉटेलचालकाने मागितले चहा-सिगारेटचे पैसे, त्यांनी केला खून, तीन आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:55 IST

चहा, सिगारेट न दिल्याच्या रागातून हॉटेलचालकाचा खून करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक

गंगाखेड (जि.परभणी) : शहरातील बसस्थानकाशेजारी असलेल्या बाबा सैलानी हॉटेल व पानपट्टीधारक मारोती (शिवा) तुकाराम साळवे (४५, रा.आंबेडकर नगर) यांचा चहा, सिगारेट न दिल्याच्या कारणावरून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ८:३० वाजता घडली. आरोपींना तत्काळ ताब्यात घ्या अन्यथा मृतदेह उचलणार नाही, या मागणीसाठी साळवे यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी सायंकाळपर्यंत पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयात ठाण मांडले होते.

मयताचा मुलगा अरविंद साळवे याने गंगाखेड ठाण्यात तक्रार दिली. आवेज खान गफार खान पठाण (रा.नेहरू चौक), जुनेद जरावार खान (रा. वजीर कॉलनी) व किशोर मंचक भालेराव (रा. नवा मोंढा) हे नेहमी मारोती साळवे यांच्या हॉटेलवर येऊन चहा व सिगारेट घ्यायचे व पैसे देत नव्हते. माझ्या वडिलांनी त्यांना पैसे मागितले असता वडिलांसोबत ते भांडण करायचे.

मंगळवारी सकाळी ८ वाजता मारोती साळवे व फिर्यादी हॉटेलवर असताना किशोर मंचक भालेराव याच्या सांगण्यावरून आवेज गफार खान पठाण व जुनेद जरावर खान हे दोघे कार क्रमांक (एमएच ०९ डिए-२८५०) ने हॉटेलवर आले. त्या दोघांनी चहा व सिगारेट मागितली असता मारोती साळवे यांनी देण्यास नकार दिला. हा राग मनात धरून आवेज खान व जुनेद खान या दोन आरोपींनी मृतास शिवीगाळ करून पळून गेले. सततच्या शिवीगाळीला व दहशतीचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व मारोती साळवे हे दोघे त्यांचा पाठलाग करत गोदावरी नदीघाटावर गेले. तुम्ही मला नेहमी त्रास देत आहात, अशी विचारणा करताच आवेज खान व जुनेद या दोघांनी मारोती साळवे यास छातीमध्ये, पोटावर, अन्य ठिकाणी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने मारोती साळवे जमिनीवर कोसळले व मारहाणीतून त्यांचा मृत्यू झाला, असे म्हटले आहे.

अरविंद साळवे यांच्या फिर्यादीवरून आवेज खान गफारखान पठाण, जुनेद खान जरावार पठाण व किशोर मंचक भालेराव या तिघांविरुद्ध गंगाखेड ठाण्यात भा.न्या.सं.२०२३ अन्वये १०३(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १८८९ अन्वये गुन्हा नोंद झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, प्रशिक्षणार्थी सहा.पोलिस अधीक्षक हृषिकेश शिंदे, उपनिरीक्षक विशाल बोधोडकर, आसद शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीस पकडून खुनासाठी वापरलेली कार जप्त केली. सायंकाळी साडेसहा वाजता मृत मारोती साळवे यांच्या पार्थिवावर गोदाकाठी अंत्यसंस्कार झाले. यावेळी जनसमुदाय उपस्थित होता. मृत मारोती साळवे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

आवेज खानवर अनेक गुन्ह्यांची नोंदखूनप्रकरणातील मुख्य आरोपी आवेज खान गफार खान पठाण याच्यावर गंगाखेड ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी आवेज खान यास शिताफीने अटक करून शहराच्या मुख्य मार्गावरून त्याची अक्षरशः धिंड काढली.

यापूर्वी मृताच्या चार-पाच फिर्यादचार ते पाच महिन्यांपासून आरोपी आवेज खान व इतर आरोपीविरुद्ध मृत मारोती साळवे यांनी होत असलेल्या त्रासाबद्दल चार ते पाच फिर्यादी नोंदविल्याची माहिती मृताच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र, पोलिसांकडून ठोस भूमिका न झाल्याने अखेर आरोपीकडून मारुती साळवे यांचा खून होण्यापर्यंतची मजल पोहोचली. यापूर्वीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोलिसांकडून ठोस कारवाई झाली असती तर मारोती यांना जीव गमवावा लागला नसता, अशी भावना कुटुंबीयांनी बोलून दाखवली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी