शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एक लाख १७ हजार मुलांना मिळणार मोफत दोन गणवेश

By ज्ञानेश्वर भाले | Updated: May 25, 2024 16:42 IST

शालेय शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार असून त्यापैकी एक स्काऊट गाइडशी अनुरूप तर दुसरा गणवेश आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची पँट देण्यात येणार आहे.

परभणी : समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहेत. येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने त्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांना गणवेश कसे देता येतील, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख १७ हजार ३०२ विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळणार आहे.

शालेय शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार असून त्यापैकी एक स्काऊट गाइडशी अनुरूप तर दुसरा गणवेश आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची पँट देण्यात येणार आहे. मुलींना आकाशी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाचा स्कर्ट तर आठवीतील मुलीना पंजाबी ड्रेस गणवेश मिळेल. विद्यार्थ्यांना गणवेशाची शिलाई स्थानिक पातळीवरील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिनस्त असलेल्या महिला गटांच्या माध्यमातून करण्याचे निर्देश आहेत. या गणवेशाच्या शिलाईसाठी संबंधितांना प्रति गणवेश ११० रुपयांप्रमाणे मोबदला मिळणार आहे. यासाठी समिती गठीत करण्यात आली असून यात अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी तर सदस्यपदी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा प्रतिनिधी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या ५ शाळांतील मुख्याध्यापक, लोक संचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापकांचा समावेश आहे.

मोफत बुटांसह पायमोजेही मिळणारगत शैक्षणिक वर्षापासून शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बुटासह पायमोजे शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येत आहेत. यात प्रति विद्यार्थ्यांना बुटांसह पायमोज्यांसाठी १७० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षापासून संबंधित सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील एक हजार १३१ शाळांचा समावेशसमग्र शिक्षा अभियानांतर्गत आगामी शैक्षणिक वर्षांत जिल्ह्यातील एकूण १ हजार १३१ शाळेतील एक लाख १७ हजार ३०२ विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याचे नियोजन आहे. यात ५६ हजार ६४९ मुली तर ६० हजार ६५३ मुलांचा समावेश आहेत. या अभियानांतर्गत जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक २२२ शाळांचा समावेश असून त्या पाठोपाठ परभणी ग्रामीण १६२, गंगाखेड १४९, सेलू ११२, पूर्णा ११२, पाथरी १०३, पालम १०१, सोनपेठ ८७, मानवत ७२ तर परभणी शहरातील ११ अशा एक हजार १३१ शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शाळा, तालुकानिहाय विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना नियोजित वेळेत कसा गणवेश मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.- सुनील पोलास, शिक्षणाधिकारी प्रा. जिल्हा परिषद

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी