शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सर्पदंशानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:23 PM

डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रूग्णालयात आंदोलन 

ठळक मुद्देनातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर आरोपआश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात

येलदरी (जि. परभणी) :  सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मारुती उत्तमराव वाकळे (३८) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आंदोलन केले़ अखेर सायंकाळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला़ 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, येलदरी येथील मच्छीमार मारुती उत्तमराव वाकळे यांना २५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता सापाने चावा घेतला़ त्यानंतर नातेवाईकांनी त्यास तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले़ मात्र आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास घुगे मुख्यालयी नव्हते. त्यामुळे मारुतीवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत़ त्यामुळे येलदरी येथून त्यांना जिंतूर येथे नेण्यात आले़ तेथेही उपचार झाले नाहीत़ पुढे परभणी येथे नेत असताना मारुती यांचा वाटतेच मृत्यू झाला़  त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुले असा परिवार आहे़ मारूती यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार गेला आहे. 

आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यातदोषी डॉक्टरांवर कारवाई करावी़, या मागणीसाठी २६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नातेवाईक व गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या मांडला़ त्यामुळे तणाव निर्माण झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनुपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ़ श्रीनिवास घुगे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल़ तसेच मुख्यालयी राहणारे वैद्यकीय अधिकारी दोन-तीन दिवसांत देण्यात येतील, असे लेखी आश्वासन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ दिनेश बोराळकर यांनी दिले़ त्यानंतर दीड तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला़

टॅग्स :Deathमृत्यूsnakeसापparabhaniपरभणीdoctorडॉक्टर