शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

परभणीत शेतकºयांचे एक कोटी ८१ लाख रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:36 IST

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत.

सत्यशील धबडगे।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत: मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत.मानवत व पाथरी तालुक्यासाठी ९ फेब्रुवारीपासून मानवत येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये विदर्भ फेडरेशनच्या वतीने तूर खरेदीस सुरुवात करण्यात आली़ पाथरी व मानवत तालुक्यातील १ हजार ७०५ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ नोंदणी झालेल्या शेतकºयांना केंद्र चालक व खरेदी- विक्री संघाच्या वतीने संदेशही पाठवून खरेदी केंद्रावर तूर आणण्याचे आवाहन केले जात आहे़ विदर्भ फेडरेशनने ६ मार्चपर्यंत १९९ शेतकºयांची २ हजार ५३५ क्विंटल तूर खरेदी केली आहे. तर १ हजार ५०४ शेतकºयांची तूर खरेदी करणे शिल्लक आहे. परंतु, खरेदी केंद्रावर तूर विक्री करुनही एकाही शेतकºयाला रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे १९९ शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख १५ हजार ७५० रुपये थकले आहेत. ८ दिवसांमध्ये शेतकºयांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करण्याचे आदेश शासनाने दिलेले असतानाही महिना उलटला तरीही एकाही शेतकºयाच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही़ त्यामुळे शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या लग्नसराई सुरु आहे. अनेक शेतकºयांनी तुरीच्या भरोस्यावर लग्न कार्य ठरविले आहे. परंतु, रक्कमच हाती आली नसल्याने शतकरी हतबल झाले असून तुरीच्या रक्कमेसाठी चकरा मारत आहेत.शेतकºयांचा ओढा हमी भाव केंद्राकडे४सध्या बाजारपेठेमध्ये ४ हजार ३०० पासून ४ हजार ५०० रुपये पर्यंत प्रति क्विंटल दर आहेत. तर हमीभाव केंद्रावर ५ हजार ४५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी तूर खरेदी केंद्र जवळ करीत आहेत. तालुक्यातील शेतकरी तूर विक्रीसाठी अजूनही नोंदणी करीत आहेत. त्यामुळे शेतकºयांची संख्याही वाढत आहे.सॉफ्टवेअरमध्ये अडचण असल्यामुळे तूर खरेदी केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास विलंब होत आहे.-भागवत सोळंके, जिल्हा विपणन अधिकारी, विदर्भ मार्केटींग फेडरेशन