शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

अशुद्ध पाणी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांना अर्पण; विविध मागण्यांवरुन गंगाखेडमध्ये भाजपा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 16:37 IST

गंगाखेड शहराला आठ ते दहा दिवसाआड होत असलेला अशुद्ध पाणी पुरवठा बंद करून शहर वासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा.

गंगाखेड: गोदावरी नदी पात्रात तात्पुरता बंधारा बांधून गंगाखेड शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा या व अन्य विविध मागण्यांसाठी शनिवारी ( दि. २० ) भाजपाचा मोर्चा नगर परिषद कार्यालयावर धडकला. आक्रमक आंदोलकांनी नळाला आलेले अशुद्ध पाणी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला अर्पण केले. 

गंगाखेड शहराला आठ ते दहा दिवसाआड होत असलेला अशुद्ध पाणी पुरवठा बंद करून शहर वासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी गीदावरी नदी पात्रात तात्पुरता बंधारा बांधून वाहून जाणारे पाणी अडवावे. मुख्य बाजार पेठेतील पोलीस स्टेशन ते पोस्ट ऑफिस कार्यालय रस्ता दुरुस्त करावा, शहरातील नित्कृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी आदी विविध मागण्यांसाठी भाजपाच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता भगवती चौक येथून नगर परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. 

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याऐवजी उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, पाणी पुरवठा अभियंता मयुरी पाटील व कार्यालयीन अधीक्षक शेख अफजलोद्दीन निवेदन स्विकारायला आले. यामुळे आक्रमक आंदोलकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांना अशुद्ध पाणी अर्पण करून अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे, अड. व्यंकटराव तांदळे, बाबासाहेब जामगे, माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके, शहराध्यक्ष श्रीनिवास मोटे, महिला आघाडी शहराध्यक्ष रुपाली जोशी, रेखा पेकम, पदमजा कुलकर्णी,  आदिनाथ मुंडे, तुकाराम आय्या, अरुण मुंडे, गोविंद रोडे, सविता राखे, बाळासाहेब गव्हाणकर, रेणुका असमार, कृष्णा कवठेकर, रामेश्वर अळनुरे, रवि जोशी, श्रीपाद कोद्रीकर, भास्कर जाधव, कमलबाई शेटे, अनिता कुलकर्णी, प्रभाकर लंगोटे आदींचा मोर्चा सहभाग होता. 

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीBJPभाजपा