रुग्ण संख्या घटली, मात्र मृत्युचे सत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:18 AM2021-05-06T04:18:35+5:302021-05-06T04:18:35+5:30

परभणी : जिल्ह्यात बुधवारी ७८५ रुग्णांची नोंद झाली असून, ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांची संख्या घटली ...

The number of patients decreased, but the death sessions did not stop | रुग्ण संख्या घटली, मात्र मृत्युचे सत्र थांबेना

रुग्ण संख्या घटली, मात्र मृत्युचे सत्र थांबेना

Next

परभणी : जिल्ह्यात बुधवारी ७८५ रुग्णांची नोंद झाली असून, ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांची संख्या घटली असली तरी मृत्यूचे सत्र कायम असल्याने जिल्हावासीयांच्या चिंता वाढल्या आहेत.

मागील तीन दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. दररोज ७०० ते ८०० रुग्ण नव्याने नोंद होत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. ५ मे रोजी ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात ४, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ४ आणि खासगी रुग्णालयात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाला २ हजार ५६२ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ७८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार ९४६ अहवालांमध्ये ५८३ आणि रॅपिड टेस्टच्या ६१६ अहवालांमध्ये २०२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४० हजार ८०२ झाली असून, त्यापैकी ३१ हजार ९८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ९५९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ७ हजार ८६३ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात २१७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४९, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २६४, अक्षता मंगल कार्यालयात १६०, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये १३४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ६ हजार ४१५ रुग्णांवर होमआयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

८०४ रुग्णांना सुट्टी

जिल्ह्यातील ८०४ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. मागील ३ दिवसांपासून बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे.

पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांवर

जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. रविवारी २ हजार ५६५ अहवालांमध्ये ७८५ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्याचा दर ३०.६४ टक्के एवढा आहे.

Web Title: The number of patients decreased, but the death sessions did not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.