शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा परिषदेत महाआघाडी; अध्यक्षपदी विटेकर तर उपाध्यक्षपदी चौधरी बिनविरोध विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 16:45 IST

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे २४, शिवसेनेचे १३, काँग्रेसचे ६, भाजपाचे ५, रासप ३, घनदाट मित्र मंडळ १ आणि अपक्ष १ असे ५४ सदस्यांचे संख्याबळ आहे.

ठळक मुद्दे राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेतही अस्तित्वात आली आहे. त्यामुळे या आघाडीचे एकूण ४३ सदस्य झाले आहेत.

परभणी- परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांची तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी ७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अर्ज दाखल करावयाचा होता. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गटाच्या जि.प. सदस्या निर्मलाताई विटेकर यांचा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचेच जिंतूर तालुक्यातील बोरी जि.प. गटाचे सदस्य अजय चौधरी यांचेच अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत दाखल झाले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.सूचेता शिंदे यांनी तशी घोषणा केली. यावेळी जि.प.सीईओं बी.पी.पृथ्वीराज, अतिरिक्त सीईओं विजय मुळीक यांच्यासह मावळत्या जि.प.अध्यक्षा उर्मिलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह विविध पक्षातील सदस्यांची उपस्थिती होती. निवडीनंतर नूतन अध्यक्षा विटेकर आणि उपाध्यक्ष चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आ.बाबाजानी दुर्राणी, शिवसेनेचे आ.राहुल पाटील, माजी आ. विजय भांबळे आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.

विरोधी पक्षच झाला गायबजिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे २४, शिवसेनेचे १३, काँग्रेसचे ६, भाजपाचे ५, रासप ३, घनदाट मित्र मंडळ १ आणि अपक्ष १ असे ५४ सदस्यांचे संख्याबळ आहे. राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेतही अस्तित्वात आली आहे. त्यामुळे या आघाडीचे एकूण ४३ सदस्य झाले आहेत. असे असले तरी बहुतांश सदस्य हे महाविकास आघाडीमध्येच आल्याने जिल्हा परिषदेत विरोधी पक्षच राहिलेला नाही. विरोधी पक्षच अस्तित्वात नसलेली परभणी जिल्हा परिषद ही कदाचित महाराष्ट्रातील पहिलीच जिल्हा परिषद असेल. त्यामुळे एकीकडे सत्ताधारी पक्ष मजबूत झाला असताना या सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षच नसल्याने जि.प.तील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवणार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

पत्रकारांना सभागृहात प्रवेश बंदएकीकडे जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष अस्तित्वात नसताना प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये पत्रकारांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे सर्वसाधारण सभेतील आरोप- प्रत्यारोप, विविध विषयांच्या अनुषंगाने होणारी चर्चा याबाबी जनतेसमोर येत नाहीत. या संदर्भात पत्रकारांनी आवाज उठविल्यानंतरही सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी त्याला दाद दिलेली नाही. त्यामुळे पत्रकारांचा सर्वसाधारण सभेतील प्रवेश बंदच आहे. 

टॅग्स :Parbhani z pपरभणी जिल्हा परिषदparabhaniपरभणीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस