शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

पालमच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंगल सिरस्कर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 18:20 IST

राष्ट्रवादीच्या 10 नगरसेवकांसह एका अपक्षाने नगराध्यक्षाला पाठींबा दिला.

 पालम ः अपेक्षेप्रमाणे पालम नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंगलबाई वसंतराव सिरस्कर तर उपनगराध्यक्षपदी पठाण अनवरीबी हिदायतुल्लाखाँ यांची अविरोध निवड झाली. दोन्ही पदासांठी प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने शुक्रवारी (ता.11) दुपारपर्यंत निवडीची विशेषसभा आटोपली. विशेषतः राष्ट्रीय समाज पक्ष, भाजप आणि एक अपक्ष मिळून 6 सदस्य बैठकीला अनुपस्थित राहिले. तर राष्ट्रवादीच्या 10 नगरसेवकांसह एका अपक्षाने नगराध्यक्षाला पाठींबा दिला.

पालम नगरपंचायत निवडणूकीत 17 पैकी 10 जाग्यांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे. बहूमतासाठी राष्ट्रवादीला  9 सदस्यांची आवश्यक होती. तरीही गत पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे ऐनवेळी गडबड होऊ नये, म्हणून राष्ट्रवादीने नगरसेवकांना सहलीवर नेले होते. दरम्यान, नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात 4 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मुदत दिली होती. दिवसभरात राष्ट्रवादीकडून मंगलबाई सिरस्कर यांचा एकमेव अर्ज आला होता. तेव्हांच राष्ट्रावादीने फटाके फोडले होते. परंतु अध्यक्षांसह उपनगराध्यक्षांच्या निवडीसाठी 11 फेब्रवारी रोजी विशेषसभा बोलावली होती. त्यात नगराध्यक्षाप्रमाणेच उपनगराध्यक्षसाठी राष्ट्रवादीकडून पठाण अनवरीबी हिदायतुल्लाखाँ यांचा एकमेव अर्ज आला. अन्य कोणीही उमेदवारी दाखल केला नाही. त्यांना राष्ट्रवादीचे 10 आणि एका अपक्ष मिळून 11 सदस्यांनी पाठींबा दर्शविला. 

यानंतर निर्वाचन अधिकारी सुधीर पाटील, निवडणूक अधिकारी संतोष लोमटे यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. विशेषसभेला राष्ट्रवादीचे गटनेते भास्कर गंगाराम सिरस्कर, संजय रामराव थिट्टे, रजिया बेगम सय्यद इफ्तेखार सय्यद, सरस्वती ज्ञानराज घोरपडे, गौसिया अबुदबीन चाऊस, सरस्वती सदाशिव सिरस्कर, कैलास रामराव रूद्रवार, गजानन आबासाहेब पवार आणि अपक्ष धुरपताबाई विश्वनाथ हिवरे यांची उपस्थिती होती. निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आऩंदोत्सव साजरा केला. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसparabhaniपरभणी