शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे मातरम्'ला आमचाही विरोध, प्रकाश आंबेडकरांचा औवेसींच्या सुरात सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 19:10 IST

राष्ट्रगीत असताना 'वंदेमातरम्'ची सक्ती कशासाठी ? राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत.

परभणी : राष्ट्रगीत असताना 'वंदेमातरम्'ची सक्ती कशासाठी ? राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे 'वंदेमातरम्'ला आमचाही विरोध आहे असे मत  वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यामुळे औवेसींच्या एमआयएमशी हातमिळवणी केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी औवेसींच्या सुरात सूर मिसळल्याचे दिसून येते.

मातंग समाज सत्ता संपादन परिषदेच्या निमित्ताने अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर परभणीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आणि माझी एकवेळा भेट झाली. त्यावेळी काँग्रेससोबत युती करण्याबाबत चर्चा झाली. बोलणी करण्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्याचेही त्यांनी सांगितले. वंचित आघाडीने चार सदस्यांची समितीही स्थापन केली. मात्र काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने ही बोलणी पुढे सरकली नाही. काँग्रेससाठी आघाडीची दारे मोकळी आहेत; मात्र राष्ट्रवादी काँग्रेससाठी आघाडीची दारे बंद असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

लोकसभेच्या सर्व जागा आघाडी लढविणारकुंभार, लोहार, नाव्ही, शिंपी यासारख्या ओबीसीतील लहान घटकांचा बहुजन वंचित आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसभेच्या सर्व जागा आघाडी लढविणार असून, या निवडणुकीत ओबीसीतील लहान घटकांतूनच सर्वाधिक उमेदवार दिले जाणार आहेत. बहुजन वंचित आघाडीने एम.आय.आय. पक्षाशी मैत्री केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या चारही पक्षांनी अतिशय हिनपणे जातीचा उल्लेख केला. या हिडीस प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. ज्यावेळी जाती आणि धर्माच्या राजकारणाला आव्हान दिले जाते, त्यावेळी द्वेषाचे राजकारण होते, असे सांगून चारही मोठ्या पक्षांची ही वृत्ती वर्चस्ववादी मानसिकता असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. 

राष्ट्रगीत असताना वंदेमातरमची सक्ती का ?एम.आय.एम. पक्षाचा 'वंदेमातरम्'ला विरोध आहे, तुमची भूमिका काय? असा प्रश्न विचारला तेव्हा आंबेडकर म्हणाले, राष्ट्रगीत असताना वंदेमातरम् ची सक्ती कशासाठी ? राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे वंदेमातरम् ला  आमचाही विरोध आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणparabhaniपरभणीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन