नांदेड-पुणे महामार्गावर पडले जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:10 AM2019-07-03T00:10:21+5:302019-07-03T00:10:52+5:30

शहरातून जाणाऱ्या नांदेड-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध जागोजागी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. परिणामी दरदिवशी या खड्यांमुळे घडणाºया छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

Nanded-Pune highway collapses | नांदेड-पुणे महामार्गावर पडले जीवघेणे खड्डे

नांदेड-पुणे महामार्गावर पडले जीवघेणे खड्डे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): शहरातून जाणाऱ्या नांदेड-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध जागोजागी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. परिणामी दरदिवशी या खड्यांमुळे घडणाºया छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
गंगाखेड शहरातून जाणाºया नांदेड-पुणे महामार्गावर शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. पावसाचे पाणी साचल्याने हे खड्डे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. शहरातील बसस्थानक रस्त्यावर विष्णूदास फुलवाळकर चौकात रस्त्याच्या मधोमध असलेला गुडघ्याएवढा खड्डा ेदुचाकीचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
या रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकीसह काही नागरिक खड्यात पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मोठ्या वाहनधारकांनाही येथून वाहने चालविताना मोठी कसरत करून खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. थोडासा पाऊस पडल्यानंतर रस्त्याच्या बाजूस कचºयाने तुडूंब भरलेल्या नालीतील घाण पाणी थेट रस्त्यावर येऊन रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भल्या मोठ्या खड्यात साचत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी खड्यात साचले. परिणामी खड्डा दिसला नसल्याने या रस्त्यावरून जाणारा दुचाकीचालक कुटुंबियांसह खड्यात पडून जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. रस्त्याच्या मध्यभागी पडलेला गुडघ्याएवढा खड्डा कोणाच्या जीवावर उठेल, हे येणारा काळच सांगणार आहे. दरम्यान, नांदेड-पुणे महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते, असे असतानाही या महामार्गाच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. या खड्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा वाहनधारक व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु, झोपेचे सोंग घेऊन काम करणाºया राष्टÑीय महामार्ग विभागाला या खड्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्टÑीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन हा खड्डा दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
शिवसेनेची सा.बां. विभागाकडे धाव
च्नांदेड-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे. या रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणाºया वाहनधारकांच्या लक्षात हा खड्डा येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. हा खड्डा दुरुस्त करावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे दुरुस्तीची मागणी करण्यात आली.
च्निवेदनावर तालुकाप्रमुख अनिल सातपुते, रामकिशन शिंदे, धोंडीबा जाधव, सुभाष देशमुख, मारोती आडे, नागनाथ कदम, अजय चव्हाण, राहुल राठोड, गणेश भालेराव, अभिजित राठोड, विजय चव्हाण, रवी राठोड, माऊली क्षीरसागर, नसिंग भाले, बालाजी उंदरे, विजय मुंडे, नागेश शिंदे, राजेश निळे, किशन मुलगीर आदींच्या स्वाक्षºया आहेत.
खड्डे चुकविताना होणारा त्रास दूर करण्याची मागणी
४ शहरातून जाणाºया नांदेड-पुणे महामार्गावर, गंगाखेड बसस्थानक ते पोलीस ठाण्याकडे जाणाºया रस्त्यावर, विष्णूदास फुलवाडकर चौक, शनिवार बाजार, बसस्थानकासमोर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करून मार्ग काढावा लागत आहे.
४विष्णूदास फुलवाडकर चौक परिसरात रस्त्यावरून जाताना बस व लहान वाहने रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्यात जाऊन आदळत आहेत. या खड्यात पावसाचे पाणी साचल्यानंतर खड्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार खड्यात पडत आहेत.
४लहान मोठी वाहने व दुचाकीचालकांना हा खड्डा जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे तत्काळ हा खड्डा बुजवून वाहनधारकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Nanded-Pune highway collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.