अशासकीय प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:02+5:302021-02-05T06:03:02+5:30

येथील बाजार समितीच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याची तक्रार माजी आमदार विजय भांबळे आणि माऊली ताठे यांनी केली होती. त्यानंतर जिल्हा ...

Movements to appoint non-government administrators | अशासकीय प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली

अशासकीय प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली

येथील बाजार समितीच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याची तक्रार माजी आमदार विजय भांबळे आणि माऊली ताठे यांनी केली होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समिती नेमली. त्यात अनियमिता झाल्याचे आढळून आल्यानंतर १९ जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश काढले होते. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ताब्यातील बाजार समिती बरखास्त करण्यात भांबळे यांनी यश मिळवले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने जिंतूर प्रमाणेच येथील बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करून बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी माजी आमदार विजय भांबळे यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. प्राप्त माहितीनुसार पुन्हा एकदा अशासकीय प्रशासक मंडळावर शिवसेनेकडूनही दावा केला जात असल्याने अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने- सामने आली आहे. हा पेच मुंबईत वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्षात काय तडजोड केली जाते की? हा विषय रखडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, सध्या बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे तर प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक माधव यादव हे काम पाहत आहेत.

राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुक

बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळात स्थापन झाले तर मुख्य प्रशासक म्हणून तसेच मंडळात आपली वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते प्रयत्न करत आहेत. मंडळ नियुक्त झाले तर माजी आमदार विजय भांबळे हे कोणाच्या नावाला पसंती देतात यावर सर्व अवलंबून आहे.

Web Title: Movements to appoint non-government administrators