शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत निकालासाठी विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:37 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून गेल्या चार महिन्यांपासून विविध विषयांच्या परीक्षांचे निकाल लावले जात नसल्याच्या कारणावरुन व अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांच्या वतीने शनिवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून गेल्या चार महिन्यांपासून विविध विषयांच्या परीक्षांचे निकाल लावले जात नसल्याच्या कारणावरुन व अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांच्या वतीने शनिवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सर्व पदवी शाखेच्या परीक्षांचा निकाल लागला नसल्याने विद्यार्थ्यांना आयसीआर, एमसीएईआर आदी उच्च शिक्षणाच्या प्रवेशापासून वंचित रहावे लागत आहे. या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही गेल्या चार महिन्यांपासून निकाल लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एनएसयुआय, एआयएसएफ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या विद्यार्थी संघटनांच्या वतीने शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर कुलगुरु डॉॅ.अशोक ढवन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी एनएसयुआयचे अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, एआयएसएफचे जिल्हाध्यक्ष विश्वास कदम, संदीप सोळंके, अ‍ॅड.लक्ष्मण काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक वारकरी आदींची उपस्थिती होती.विद्यार्थ्यांच्या विविध मागण्याकृषी विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे शुल्क कमी करावे, दोन वर्षापासून प्रलंबित असलेले विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अदा करावे, यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता तात्काळ द्यावा, आयसीईआरकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वितरित करावी, ३ वर्षापासून प्रलंबित असलेली एससी, एसटी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रदान करावी, ईबीसी सवलत देण्यात यावी, पीएच.डी.च्या जागांवर विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात यावा आदी मागण्या आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीagricultureशेतीagitationआंदोलन