शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रात बुडून आई व मुलाचा मृत्यू; मुलीस वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 18:48 IST

गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या  महिलेचा तिच्या मुलासह बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील डाकूपिंप्री येथे घडली.

पाथरी (परभणी ) : गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या  महिलेचा तिच्या मुलासह बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील डाकूपिंप्री येथे घडली. याचवेळी बुडणाऱ्या मुलीस वाचविण्यास यश आले. 

तालुक्यातील डाकूपिंप्री येथील शोभा सर्जेराव रुमाले ( ३२ ) या आज सकाळी ११.३० च्या दरम्यान गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आर्यन (६ ) व मुलगी अर्पिता (९ ) होते. शोभा पकडे धुण्यात व्यस्त असताना आर्यन व अर्पिता पात्रात उतरले. आर्यन कमी पाण्यात पोहत असतानाच तो पात्रातील खोल खड्ड्याकडे गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्यात बुडू लागला हे शोभा यांच्या लक्षात आले असता त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली मात्र त्यासुद्धा त्या बुडू लागल्या. हे पासून अर्पिताने मदतीसाठी आरडाओरडा केली त्या दोघांना वाचवण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली मात्र तीही त्यात बुडू लागली. 

याच दरम्यान रामभाऊ सटवाजी महात्मे हे गावातुन आपल्या शेतीकडे जात होते. त्यांना हा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांनी लागलीच पाण्यात उडी मारली आणि प्रथम अर्पिताला बाहेर काढले. मात्र, शोभा व आर्यन यांना वाचवण्यात त्यांना यश आल नाही. काही वेळाने आजूबाजूचे शेतकरी तेथे मदतीसाठी धावले. त्यांनी शोभा आणि आर्यन यांची मृतदेह ताब्यात घेतली. पोलीस पाटील उद्धव सोनवणे यांनी पाथरी पोलिसांत घटनेची माहिती दिली.  पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमनवार, सह पोलीस उपनिरीक्षक जी आर कालापाड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. 

 

टॅग्स :Deathमृत्यूgodavariगोदावरीriverनदीWaterपाणी