शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा येथे रस्त्याच्या रखडलेल्या कामाने घेतला मोपेडचालकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 18:50 IST

सुभाष नरोजी ढोणे असे मृताचे नाव असून अपघातात त्यांची मुलगी सुद्धा गंभीर जखमी झाली आहे. 

पूर्णा (परभणी) : झिरो फाटा मार्गावर रस्त्याच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. आज सकाळी १० वाजता एका निवृत्त प्राध्यापकाचा मोपेडवरील ताबा सुटून अपघात झाल्याने मृत्यू झाला. सुभाष नरोजी ढोणे असे मृताचे नाव असून अपघातात त्यांची मुलगी सुद्धा गंभीर जखमी झाली आहे. 

पूर्णा ते झिरो फाटा या 20 की मी रस्त्याचे मागील काही दिवसांपासून काम सुरु आहे. या रस्त्यावरील लक्ष्मीनगर पाटी परिसरात दोन्ही टप्प्यातील अर्धा कि. मी. चे काम रखडलेले आहे. या ठिकाणीच वारंवार अपघात होत आहेत. आज सकाळी पूर्णा येथील सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष ढोणे (68 वर्ष) हे कोमला या त्यांच्या मुली सोबत मोपेडची पासिंग करण्यासाठी परभणी कडे जात होते. सकाळी १० वाजेच्या दरम्यान लक्ष्मीनगर पाटी जवळ खडबडीत रस्त्यावर त्यांचा मोपेडवरील ताबा सुटला. यामुळे ते तोल जाऊन खाली पडले, यात ढोणे यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने ते बेशुद्ध झाले तर कोमलसुद्धा गंभीर जखमी झाली. 

याचवेळी मधुकर खराटे, राम भुसारे व इतर काही नागरिकांनी  दोघांनाही खाजगी वाहनाने पूर्णा येथील एका रुग्णालयात दाखल केले. परंतु, ढोणे यांची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी त्यांना नांदेड येथे हलवण्याचा सल्ला दिला. नांदेड येथे रुग्णालयात दाखल केले असता दुपारी 3 वाजेता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. मागणी करूनही रस्त्याचे काम न झाल्याने हा अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  ढिसाळ कारभारामुळे झाला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीDeathमृत्यूProfessorप्राध्यापक