शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा परिषदेत विद्यार्थी गणवेशाचा कोट्यवधींचा निधी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 17:18 IST

जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून असल्याचे समोर आले आहे़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झाला नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

- चंद्रमुनी बलखंडे

परभणी : जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून असल्याचे समोर आले आहे़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झाला नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाच्या वतीने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्या अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात़ या अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थी तसेच सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावर्षीपासून गणवेश घेतल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने प्रती गणवेश २०० रुपये या प्रमाणे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर गणवेशाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ यासाठी परभणी जिल्ह्याला ३ कोटी ६७ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता़ शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, अशी अपेक्षा होती़ परंतु, विद्यार्थ्यांना बँक खाते काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शिवाय पालक व विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते काढावे लागत आहे.

जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ पात्र विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३९ हजार विद्यार्थ्यांनीच बँक खाते काढले आहे़ त्यामुळे यातील काही विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम देण्यात आल्याचा दावाही शिक्षण विभागाने केला आहे़ परंतु, अद्यापही ५२ हजार ८७१ विद्यार्थ्यांचे बँक खातेच काढण्यात आले नाहीत़ त्यामुळे हे विद्यार्थी अजूनही गणवेशापासून वंचित आहेत़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेशच उपलब्ध झाले नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आह़े. दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाकडून यावर्षीसाठी पालकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास मान्यता दिली आहे़ परंतु, हा निर्णय शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरच घेतला असता तर बहुतांश विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध झाला असता, शैक्षणिक सत्र संपत आल्यानंतर आता या गणवेशाचे करायचे काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणार आहे़ 

९१ हजार ८७१ पात्र विद्यार्थीशिक्षण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, जमाती, दारिद्रय रेषेखालील विद्यार्थी तसेच सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनींना गणवेश देण्यात येतो़ यामध्ये जिल्ह्यामध्ये ९१ हजार ८७१ पात्र विद्यार्थ्यांची संख्या आहे़ गंगाखेड तालुक्यात ११ हजार १९२, जिंतूर १६ हजार ६२६, मानवत ६ हजार ९९७, पालम ६ हजार ५५४, परभणी शहर ६५४, परभणी तालुका १७ हजार १६५, पाथरी ९ हजार ६०९, पूर्णा ९ हजार २२९, सेलू ८ हजार ९७ तर सोनपेठ तालुक्यामध्ये ५ हजार ७४७ पात्र विद्यार्थ्यांची संख्या आहे़ यातील बहुतांश विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत.

३ कोटी ६७ लाखांचा निधी शाळेकडे वर्गशासनाच्या वतीने प्रति विद्यार्थी दोन गणवेश देण्यात येतात़ यासाठीचा निधी तालुकानिहाय वितरित करण्यात आला असून, तालुकास्तरावरून प्रत्येक शाळांना वर्ग करण्यात आला आहे़ जिल्ह्यासाठी ३ कोटी ६७ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता़ त्यात गंगाखेड तालुक्याला ४४ लाख ७६ हजार ८०० रुपये, जिंतूर ६६ लाख ५० हजार ८००, मानवत २७ लाख ९८ हजार ८०० रुपये, पालम २६ लाख २१ हजार ६०० रुपये, परभणी शहर २ लाख ६१ हजार ६०० रुपये, परभणी तालुका ६८ लाख ६६ हजार, पाथरी ३८ लाख ४३ हजार ६०० रुपये, पूर्णा ३६ लाख ९१ हजार ६०० रुपये, सेलू ३२ लाख ३८ हजार ८०० रुपये तर सोनपेठ तालुक्यासाठी २२ लाख ९८ हजार ८०० रुपयांच्या निधीचा समावेश आहे़ 

टॅग्स :zpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीparabhaniपरभणी