शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

परभणी जिल्ह्यात सभा : राज्य सरकारला चढली सत्तेची नशा-अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:16 AM

राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथरी व सेलू येथील जाहीर सभेत केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी/सेलू : राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथरी व सेलू येथील जाहीर सभेत केला़२३ जानेवारी रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास पाथरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रे दरम्यान जाहीर सभा घेण्यात आली़ तर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सेलूतील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात सभा पार पडली़या दोन्ही सभांना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, चित्राताई वाघ, माजी मंत्री प्रकाश सोळंके, राजेश टोपे, बसवराज पाटील, आ़सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ़प्रदीप नाईक, आ़जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आ़बाबाजानी दुर्राणी, आ़विजय भांबळे, आ़डॉ़मधुसूदन केंद्रे, आ़शशिकांत शिंदे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अजिंक्य राणा पाटील, माजी खा़ गणेशराव दुधगावकर, माजी खा़ सुरेश जाधव, संग्राम कोते, जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आ़ व्यंकटराव कदम, दशरथ सूर्यवंशी, सारंगधर महाराज, डॉ़ संजय रोडगे, जि़प़ सभापती अशोक काकडे, गटनेते अजय चौधरी, जि़प़ सदस्य राजेंद्र लहाने, विनायक पावडे, रामराव उबाळे, माऊली ताठे, नानासाहेब राऊत, केशव बुधवंत आदींची उपस्थिती होती़पवार म्हणाले, राज्यातील सरकार सर्वच बाबीत अपयशी ठरले आहे़ समाजासमाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे़ बेरोजगारी वाढली आहे़ पीक विम्याचा लाभ शेतकºयांना मिळण्याऐवजी विमा कंपनीच्याच घशात १४ हजार कोटी रुपये घातले़ त्यामुळेक शेतकरी अस्वस्थ आहेत़ जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला़कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पोलीस खात्याचाही पूर्वीप्रमाणे दरारा राहिला नाही़ बंदोबस्त करायचा सोडून पोलीस आमच्या सभा व रॅलीचे शुटींग करण्यात मग्न आहेत़ एका पोलीस कर्मचाºयाची पत्नीच चोरांच्या टोळीत सापडली़ तिच्याकडे दोन कोटींचे घबाड सापडले़ यावरून कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती दिसून येते़ थेट सरपंच निवडीच्या निर्णयावरही टीका करीत केवळ पैशावाल्या लोकांसाठी निर्णय झाल्याचे ते म्हणाले़ भाजपचे सरकार कायदे व नियम बदलत असल्याने लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे पवार यांनी सांगितले़पाथरीतील सभेच्या यशस्वीतेसाठी अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, जुनेद खान दुर्राणी, एकनाथराव शिंदे, माधवराव जोगदंड, चक्रधर उगले, अनिल पाटील, सुनील उन्हाळे, मोईज अन्सारी, हतीम अन्सारी, राजेश ढगे, रमेश तांगडे, हन्नानखान दुर्राणी, राजीव पामे, नितेश भोरे, अलोक चौधरी आदींनी प्रयत्न केले़शिवसेनेची अवस्था केविलवाणी४अजित पवार यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवरही निशाणा साधला़ शिवसेनेची भूमिका नेहमीच दुटप्पी असते़ शिवसेनापूर्वी वाघासारखी होती़ परंतु, आता शेळी, ससाही नाही तर कासव झाली आहे़सरकार झोपेतच- मुंडे४विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खुमासदार शैलीत राज्य सरकारवर टिका केली़ महाराष्ट्र सरकार हे रामदेव बाबाचे सरकार झाले आहे़ पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत़ महागाई वाढत आहे़ जनता त्रस्त असताना सरकार मात्र झोपेत असल्याचा आरोप त्यांनी केला़