परभणी विभागीय कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सात आगारांत जवळपास २ हजार ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागला. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात दोन-तीन महिने कर्मचाऱ्यांना पगारासाठी वाट पाहावी लागली. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य शासनाने ५०० कोटींचा निधी एसटी बस महामंडळाला देण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला. असे असले तरी दीड वर्षभरापासून वैद्यकीय बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन वेळेत वैद्यकीय बिले देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
एसटीच्या अधिकारी, कर्मचारी यांना जानेवारी २०२० पासुन वैद्यकीय बिले मिळत नसल्याने नियमीत वैद्यकीय उपचारासाठी अर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. मागील दोन महिन्याचे वेतन वेळवर झाले नव्हते .कर्मचार्यांना वैद्यकीय उपचारा अभावी उसनवारी करावी लागली आहे.सदरची उसनवारी परतफेड करण्यासाठी वैद्यकीय बिला बाबत स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली असता ही बिले अदा करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगीतल्या जाते. निधी अभावी कर्मचारी यांना घरसंसार व नियमीत उपचार घेणे देखील अडचणीचे झाले आहे. तसेच सेवा निवृत्त कर्मचारी यांचे शिल्लक रजेची रक्कम व फरक देखील वेळेत मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचारी यांना संसाराचा गाडा चालवणे देखील अवघड झाले आहे.
गोविंद वैदय, विभागीय सचिव
कोविड १९ मध्ये माझी पत्नी आजारी असल्याने मला त्या आजारामुळे ६ महिने दवाखान्यात दाखवावे लागले. त्यांच्या उपचारासाठी ३ लाख रुपये खर्च झाला. सदरचा खर्च नातेवाईक व इतराकडुन घेऊन केला आहे. या बिलाची फाईल विभागीय कार्यालयाकडे दिड वर्षापासून सादर केली आहे. ती मंजुर झाली आहे. परंतु सदरची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे नातेवाईक यांना उसनवारी परत करता न आल्याने नाराजी निर्माण होत आहे. व भविष्यात अडचण निर्माण झाल्यास नातेवाईक सुध्दा मदत करण्याची शक्यता नाही.
कृष्णा राडकर,चालक, परभणी आगार ॉ
एसटी कामगार अहोरात्र मेहनत करून प्रवाशी वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोविड १९ मध्ये सुध्दा कोरोना योध्दा म्हणुन काम केलेले आहे. त्या वेळी विषेश प्रोत्साहन भत्ता देखील अद्याप अदा केला नाही. तसेच कामगारांचे वैद्यकीय बिले अदा केली जात नाहीत. त्यामुळे कामगार हवाल दिल झाला. या घटनेला जबाबदार नसताना आम्हाला व आमच्या कुटुंबाला त्याच्या यातना भोगाव्या लागत आहेत.
रामभाऊ देवगुडे,चालक,परभणी आगार