शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुलांना शाळेत पाठवणे केले बंद; परभणी जिल्ह्यात पालकांनी छेडले अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:06 IST

सारोळा (बु.) येथील मराठा समाजाच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन एक वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन छेडले आहे.  

पाथरी (परभणी ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे राज्यभर विविध आंदोलने सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सारोळा (बु.) येथील मराठा समाजाच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन एक वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन छेडले आहे. 

सारोळा (बु.) येथे जिल्हा परिषदेची पहिली ते आठवी पर्यंत शाळा आहे. गावातील मराठा समाजाच्या मुलांचा याच शाळेत प्रवेश आहे. येथील पालकांनी गटविकास अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि गटशिक्षण अधिकारी यांना बुधवारी एक निवेदन दिले. निवेदनात २ ऑगस्ट पासून मराठा आरक्षण लागू होईपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालकांनी नमूद केले.  

यानुसार आजपासून मराठा समाजाच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. यामुळे आज शाळेत ७२ टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते.  या शाळेत १ ली ते ८ वी ११८ विध्यार्थी आहेत. बुधवारी शाळेत ११६ विद्यार्थी उपस्थित होते. आज आंदोलन सुरू झाल्यानंतर ११८ पैकी केवळ ३३ विध्यार्थी शाळेत आली. उर्वरित मराठा समाजाची ८५ विध्यार्थी शाळेत आलेच नाही. 

शाळा बंद आंदोलन टाकलगव्हान येथेहीसारोळा (बु.) प्रमाणे तालुक्यातील टाकलगव्हान येथेही याच प्रमाणे आंदोलनास सुरुवात झाली आहे. दुपारी १ नंतर येथील पहिली ते पाचवी वर्गाच्या जिल्हा परिषद शाळेत येऊन पालकांनी मुलांना घरी नेले. मराठा आरक्षण लागू होईपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्धार पालकांनी केला असून या विषयीचे निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलनStudentविद्यार्थी