शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती केली १ लाख क्विंटल कापसाची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 19:24 IST

मानवत  ( परभणी ): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात १६ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५ हजार १०० ...

मानवत  (परभणी ): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात १६ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५ हजार १०० रुपये भाव मिळाला आहे़ आतापर्यंत १ लाख ७ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद मानवत बाजार समितीकडे झाली आहे़ 

मानवत तालुक्यात यावर्षी बहुतांश शेतकर्‍यांनी कापूस पिकाची लागवड केली आहे़ जून, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पिके चांगली आली होती़ त्यानंतर पावसाने पाठ फिरविली होती़ परंतु, शेतकर्‍यांनी उपलब्ध पाण्यावर कापसाला जगविले़ त्यामुळे कापसाला बोंडे प्रचंड लागली होती़ सुरुवातीच्या दोन वेचण्या चांगल्या झाल्या़ त्यानंतर मात्र परतीचा पाऊस चांगला झाला़ मात्र यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात झाला़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़ पहिल्या दोन वेचण्यांमध्ये चांगला कापूस निघाल्याने शेतकर्‍यांनी मानवत बाजार समितीमध्ये विक्रीसाठी दाखल करण्यास सुरुवात केली आहे़

शासनाने हमीभाव जाहीर केले़ मध्यम धाग्याच्या कापसाला ४ हजार ३२० रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला ४ हजार ३८० रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित केला़ मानवत येथे ९ नोव्हेंबरपासून बाजार समितीच्या यार्डामध्ये कापसाच्या लिलावास सुरुवात झाली. हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत़ कापूस विक्रीनंतर लगेच नगदी पैसे मिळत असल्याने परभणी, सोनपेठ, पाथरी तालुक्यातील शेतकरी मानवत बाजारपेठेमध्ये येत आहेत़ येथील खाजगी परवानाधारक खरेदीदारांसह सीसीआयने १५ डिसेंबरपर्यंत १ लाख ७ हजार ७७० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे़ येथील बाजारपेठेतील चित्र पाहता आगामी काळामध्ये कापसाचा दर वाढणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने यावर्षी बोंडअळीने नुकसान होवूनही कापूसच शेतकर्‍यांना तारेल, अशी शक्यता सध्या तरी दिसून येत आहे़ 

खरेदीसाठी  चुरस वाढलीशासनाचा हमीभाव ४ हजार ३२० रुपये असला तरी खुल्या बाजारात कापूस खरेदी करण्याचे आदेश धडकल्याने सीसीआयचे केंद्रप्रमुख पवार यांनी खुल्या बाजारात कापूस खरेदीला सुरुवात केली़ १५ डिसेंबरपर्यंत सीसीआयने ४ हजार ९०० क्विंटल कापसाची खरेदी केली़ सीसीआय खरेदीसाठी मैदानात उतरल्याने कापूस खरेदीसाठी चुरस वाढली आहे़ दरम्यान, अटींची पूर्तता व कापूस विक्री केल्यानंतर पैशांसाठी वाट पहावी लागत असल्याने अनेक शेतकरी खाजगी व्यापार्‍यांना माल विक्री करून नगदी पैसे घेण्याला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे़ 

५ हजार १०० रुपयांचा मिळालामानवत बाजार समितीमध्ये आतापर्यंत ५ हजार १०० रुपये कमाल तर ४ हजार ७०० रुपये किमान भाव मिळाला आहे़ शनिवारी झालेल्या लिलावात सभापती गंगाधरराव कदम, उपसभापती पंकज आंबेगावकर, सीसीआयचे केंद्रप्रमुख पवार, गिरीष कत्रुवार, विजय पोरवाल, भगवान गोलाईत, संदीप पेन्शनलवार, गौरव अग्रवाल, रामनिवास टवाणी, रामनिवास सारडा, जुगल काबरा आदी खरेदीदार सहभागी झाले होते़

कापसाला चांगला भाव मिळत आहे मानवत येथील बाजार समितीच्या यार्डामध्ये कापसाला चांगला भाव मिळत आहे़ शेतकर्‍यांनी आपला कापूस परस्पर विक्री न करता लिलावात आणून विक्री करावा़ -गंगाधरराव कदम, सभापती 

टॅग्स :cottonकापूसparabhaniपरभणीFarmerशेतकरी