शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Gram Panchayat Election Results : महाविकास आघाडी या ग्रामपंचायतीसाठी आपसात भिडली; बहुमतापासून तीनही पक्ष दूर 

By सुमेध उघडे | Updated: January 18, 2021 13:37 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results : तालुक्यातील उमरा या ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी मतदान घेण्यात आले.

ठळक मुद्देपाथरी तालुक्यातील उमरा येथील निवडणूकबहाद्दर मतदारांनी कोणालाच नाराज केलं नाही

पाथरी : परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. पाथरी तालुक्यात तर उमरा ग्रामपंचायतीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आपसात भिडले होते. आज लागलेल्या निकालानंतर येथील चित्र स्पष्ट झाले असून मतदारांनी तीनही पक्षाला बहुमतापासून दूर ठेवले आहे. 

तालुक्यातील उमरा या ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. येथे राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात तिरंगी लढत झाली. शिवसेनेचे तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडीच एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपसात भिडत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे येथील निकालाकडे लक्ष लागले होते. तीनही पक्षाने ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी जोर लावला होता. मात्र, आज सकाळी लागलेल्या निकालात कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना 3 आणि कॉंग्रेसला 2  जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीतील आपसात भिडलेल्या तीनही पक्षाच्या उमेदवारांना मत देत कोणत्याच पक्षाला नाराज केले नसल्याचे चित्र आहे.

येथेही होणार महाविकास आघाडी ?शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे राज्यातील सत्तेत महाविकास आघाडीखाली एकत्र आलेले आहेत. यानंतर शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री झाला. आता सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर येथेही गावाच्या विकासासाठी तीनही पक्ष एकत्र येणार का ? यावर ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतparabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस