शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लाँग मार्च! सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या, परभणीतून हजारों अनुयायी मुंबईकडे रवाना

By राजन मगरुळकर | Updated: January 17, 2025 19:40 IST

परभणीत झालेल्या संविधान अवमानाच्या घटनेनंतर आंदोलनात ताब्यात घेतलेल्या न्यायालयीने कोठडीत मयत झालेला सोमनाथ सूर्यवंशी आणि मयत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचे शासनाने पुनर्वसन करावे

परभणी : परभणीतील सुरू असलेल्या आंदोलनात आंबेडकरी चळवळीतील अनुयायांच्या प्रमुख मागण्या मान्य न झाल्याने परभणी ते मुंबई लाँग मार्च शुक्रवारी सायंकाळी परभणीतून रवाना झाला. यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला, युवक, आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि अनुयायी सहभागी झाले आहेत.

परभणीत झालेल्या संविधान अवमानाच्या घटनेनंतर आंदोलनात ताब्यात घेतलेल्या न्यायालयीने कोठडीत मयत झालेला सोमनाथ सूर्यवंशी आणि मयत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचे शासनाने पुनर्वसन करावे, वाढीव आर्थिक मदत द्यावी, पोलीस अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करावेत, निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासह तपास, शासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत आंबेडकरी संघटना, पदाधिकारी यांचे परभणीत ३३ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्याचे नियोजन केले. 

लाँग मार्चला शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास परभणीतून सुरुवात झाली. धरणे आंदोलन मैदानात शहर, जिल्ह्यातील महिला, युवक सकाळपासून दाखल झाले होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोगत झाल्यानंतर सायंकाळी लाँग मार्चला सुरुवात झाली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लाँग मार्च रवाना झाला. बसस्थानक, उड्डाणपूल, जिंतूर रोड मार्गे हा लाँग मार्च टाकळीत पहिल्या दिवशी मुक्कामी राहणार आहे. हजारोंच्या संख्येने लाँग मार्चमध्ये नागरिक, अनुयायी सहभागी झाले आहेत. यावेळी  आशिष वाकोडे, रवि सोनकांबळे, सुधीर सा‌ळवे यांच्यासह हजारो पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.   

सूर्यवंशी कुटूंबाने दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतमयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा लाखांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मदतीचा धनादेश काही दिवसांपूर्वी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी कुटुंबीयाला सूपूर्द करण्यास भेट घेतली होती. त्यावेळी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ आणि आई यांनी ही मदत नाकारली होती. गुरुवारी परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह तहसीलदारांनी पुन्हा सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. मात्र, जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत व न्याय मिळत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याची माहिती प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी निघालेल्या लाँग मार्चमध्ये मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ अविनाश सूर्यवंशी आणि अशोक सूर्यवंशी हे दोघे सहभागी झाले आहेत. आई आणि भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी हे नंतर मुंबईकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलन