शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

परभणी येथे व्याख्यान :स्मार्टनेस पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे- संतोष कार्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:15 AM

विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून अभ्यासाचे क्षेत्र निवडावे़ तसेच योग्य नियोजन केल्यास ध्येयापर्यंत पोहचता येते़ यासाठी केवळ कठोर पद्धतीने अभ्यास करून चालणार नसून स्मार्टनेस पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे, तरच यशस्वी होता येते, असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक व्याख्याते संतोष कार्ले यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून अभ्यासाचे क्षेत्र निवडावे़ तसेच योग्य नियोजन केल्यास ध्येयापर्यंत पोहचता येते़ यासाठी केवळ कठोर पद्धतीने अभ्यास करून चालणार नसून स्मार्टनेस पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे, तरच यशस्वी होता येते, असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक व्याख्याते संतोष कार्ले यांनी केले़येथील श्री शिवाजी महाविद्यालयात १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात कार्ले बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.बाळासाहेब जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य ए.एन. डहाळे, प्रा.एस.एम. कुलकर्णी, प्रा.डी.बी.पाटील, प्रा.पी.पी. शिंदे, प्रा.एस.एन. मुंडे, प्रा.प्रकाश शिंगे, प्रा.किनगे आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्ले यांनी विज्ञान शाखेतील विविध अभ्यासक्रमाची माहिती दिली. कार्ले म्हणाले, केवळ वैद्यकीय व अभियांत्रिकी अशा दोनच शाखा करिअरसाठी नसून हजारो अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आपल्याला अभ्यासक्रमाची माहिती नसल्याने या संधीपासून वंचित राहतो. दहावीनंतर जवळपास २००, बारावी कला शाखेमध्ये ८४, वाणिज्य १५०, पदवीमध्ये ३५०, एमबीबीएसमध्ये १०९, पदविकामध्ये ९७, पत्रकारितेत १८, फोटोग्राफीमध्ये १७, कायदा अभ्यासक्रमामध्ये ४३ प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय दहावी, बारावी पास, नापास विद्यार्थ्यांसाठीही आयटीआयमध्ये जवळपास ११२ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन आपल्याला करिअर निवडता येते, असे त्यांनी सांगितले़ या प्रसंगी जेईई, नीट परीक्षेसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.शिवाय देशभरातील विविध संस्था त्यामध्ये राबविले जाणारे अभ्यासक्रम, पात्रता व यासाठी लागणाºया परीक्षा याची माहितीही त्यांनी सांगितली. प्राचार्य जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी बारावीतील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील वर्षभरातील अनुभव सांगितले़ प्रा. एस.एन. मुंडे यांनी प्रास्ताविक केले.