शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यासाठी मिळणार जायकवाडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:48 IST

जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परभणी जिल्ह्याला सुरुवातीला जायकवाडी धरणातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली होती. त्यानंतर जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात होती. यावर्षी परभणी जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने या भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाथरी मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ हे तिन्ही तालुके गंभीर दुष्काळ म्हणून शासनाने जाहीर केली आहेत. जायकवाडीच्या पाथरी येथील उपविभागांतर्गत पाथरी आणि मानवत तालुक्याचा बराच भाग येतो. या भागात रबीची पेरणी झाली. या भागात पिण्याचे पाणी तसेच शेतकºयांच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता होती. जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यासाठी जलसंपदामंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र मागे दोन महिन्यापासून कालवा सल्लागार समितीची बैठकच झाली नसल्याने जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय रखडला होता. आ.मोहन फड यांनी शासनस्तरावर याबाबत लेखीपत्र देऊन मागणी केली होती. ८ जानेवारी रोजी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला आ.मोहन फड, माजीमंत्री राजेश टोपे, गेवराईचे आ.लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची उपस्थिती होती. २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आ.मोहन फड यांनी दिली. दरम्यान, पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने दुष्काळी भागात जायकवाडी धरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे कालवा सल्लागार समितीची बैठक लांबत असल्याने ‘जायकवाडीच्या पाण्याची अनिश्चितता कायम’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते.दुष्काळी भागाला होणार फायदा४परभणी जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे साठे आटले आहेत. पाणीपातळी खालावल्याने या भागात जायकवाडीच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. पाणी सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याने या भागाला दिलासा मिळाला आहे.-आ.मोहन फड, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीGirish Mahajanगिरीश महाजन