ग्रामीण भागात ४१ हजार नागरिकांच्या तपासण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:14+5:302021-03-07T04:16:14+5:30

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने आरटीपीसीआर आणि रॅपिड ॲंटिजेन चाचण्या वाढविल्या आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत ४१ ...

Inspections of 41,000 citizens in rural areas | ग्रामीण भागात ४१ हजार नागरिकांच्या तपासण्या

ग्रामीण भागात ४१ हजार नागरिकांच्या तपासण्या

Next

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने आरटीपीसीआर आणि रॅपिड ॲंटिजेन चाचण्या वाढविल्या आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत ४१ हजार ७१७ ग्रामस्थांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती जि. प. च्या आरोग्य विभागाने दिली.

महिनाभरापूर्वी थांबलेला कोरोनाचा संसर्ग आता पुन्हा नव्याने उफाळून आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचण्या सुरू केल्या आहेत. शहरी भागात लघू व्यवसायिक, फेरीवाले तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या केल्या जात आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानेही या तपासण्यांवर भर दिला असून ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये आरटीपीसीआर आणि रॅपिड ॲंटिजेन चाचण्या केल्या जात आहेत. आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची प्राधान्याने आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर त्यावर पुढील उपचार केले जातात. मध्यंतरी या चाचण्यांचे प्रमाण कमी केले होते. परंतु, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून ते आजपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये ४१ हजार ७१७ जणांची तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण शोधण्याची मोहीम जोरात सुरू झाली आहे. संशयास्पद नागरिक, गंभीर आजार असलेले नागरिक आणि विविध आजारांवर उपचारासाठी दाखल रुग्णांचीही चाचणी केली जात आहे.

फेब्रुवारी महिन्यात १२ हजार तपासण्या

जिल्ह्यातील ग्रामीण भागात फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक चाचण्या घेण्यात आल्या. महिनाभरात १२ हजार ४१२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. पूर्णा तालुक्‍यात सर्वाधिक २ हजार ४३४ नागरिकांच्या तपासण्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यात १ हजार ८१०, गंगाखेड तालुक्यात १ हजार ६८३, परभणी १ हजार ३६८, पाथरी ८६२, मानवत ५९३, पालम १ हजार ३६६, सेलू ८७९, आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १८६ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.

३८ हजार नागरिकांची स्वॅब तपासणी

ग्रामीण भागातील ३८ हजार ४४६ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यात परभणी तालुक्यात ८ हजार ८४८, पाथरी : २ हजार ५२६, पूर्णा : ४ हजार ८१५, जिंतूर : ४ हजार १८२, गंगाखेड : ६ हजार ३७९, मानवत : १ हजार ८१०, पालम : ३ हजार ६४१, सेलू : ३ हजार १०२ आणि सोनपेठ तालुक्यात ३ हजार १४३ नागरिकांचा समावेश आहे.

Web Title: Inspections of 41,000 citizens in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.