शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

महागाईच्या भडक्याने परभणीकर त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:35 IST

देशात सर्वाधिक महाग पेट्रोल परभणीकरांना खरेदी करावे लागत असून इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने परभणीकर चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशात सर्वाधिक महाग पेट्रोलपरभणीकरांना खरेदी करावे लागत असून इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने परभणीकर चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे़पेट्रोलडिझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महागाईच्या झळा सर्वसामान्यांना चांगल्याच बसू लागल्या आहेत़ यामध्येच देशात सर्वाधिक पेट्रोल व डिझेलचे दर परभणीमध्ये असल्याने इतर शहरांच्या तुलनेत परभणीकरांचा खिसा अधिकचा खाली होवू लागला आहे़ मंगळवारी परभणी शहरात भारत पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोलचा दर ९२़०७ रुपये तर डिझेलचा दर ७९़२७ रुपये प्रती लिटर होता़ हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल ९२़०५ रुपये तर डिझेल ७९़२५ रुपये प्रतिलिटर होते़ इंडियन आॅईलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल ९१़९६ रुपये तर डिझेल ७९़१७ रुपये प्रतिलिटर दराने विक्री झाले़ देशभरात बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर ९१ रुपयांच्या घरात असताना परभणीत मात्र ते ९२ रुपयांच्या घरात गेल्याने महागाईची तीव्रताही वाढू लागली आहे़ परिणामी आता शहरातील वाहतुकीच्या दरांमध्येही आॅटोचालकांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़ पूर्वी बसस्थानक, रेल्वेस्थानकापासून देशमुख हॉटेल, काळी कमान, वसमत रोड, जिंतूर रोड आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रती व्यक्ती १० रुपये भाडे आकारले जात होते़ आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे़ प्रती व्यक्ती १५ रुपये ग्राहकांकडून आॅटो चालक घेत असल्याने प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत़ प्रवासी वाहतुकीचे दर वाढल्यानंतर आता बाजारातील भाजीपाल्याचे दरही वाढण्याची शक्यता आहे़ शिवाय ट्रान्सपोर्ट चालकांकडूनही भाडेवाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत़ त्यामुळे केंद्र शासनाने इंधन दरवाढीवर आळा घालून इंधनाचे दर जीएसटीमध्ये आणावेत, अशी मागणी आता नागरिकांमधून होवू लागली आहे़अकोल्यातून इंधन मागविल्यास फायदापरभणी शहराला ३३० किमी अंतरावर असलेल्या मनमाड येथील तेल डेपोतून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होतो़ मराठवाड्यात कोठेही इंधन साठविण्याचा डेपो नाही़ नांदेड शहराला अकोला येथील डेपोतून इंधनाचा पुरवठा होतो़ त्यामुळे परभणीपेक्षा नांदेड येथील पेट्रोल, डिझेलचे दर कमी आहेत़ परभणी येथील वितरकांनी २०१ किमी अंतरावर असलेल्या अकोला येथील तेल डेपोतून पेट्रोल, डिझेल मागविल्यास निश्चितच इंधनाचे दर काही अंशी तरी कमी होतील; परंतु, या संदर्भात पुढाकार घेणार तरी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे़ जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते मंडळी व अधिकाऱ्यांनी या प्रश्नी पुढाकार घेणे आवश्यक आहे; परंतु, तसे होताना दिसून येत नाही़ शिवाय बहुतांश परभणीकरही देशात सर्वाधिक पैसा मोजून पेट्रोल, डिझेलची खरेदी करीत चुप्पी साधून आहेत़महिनाभरात ३० रुपयांनी गॅस महागएकीकडे पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना घरगुती वापराच्या गॅसच्या दरामध्येही सातत्याने वाढ होत आहे़ परभणीत ८४७़५० रुपये प्रती १४ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना मोजावे लागत आहेत़ यापूर्वी एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल १७१़५० रुपयांनी प्रती सिलिंडर महाग झाला आहे़ एप्रिल महिन्यात १४ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ६७६ रुपये मोजावे लागत होते़ मे महिन्यात यामध्ये थोडीची कपात होवून ६७४़५० रुपये गॅस सिलिंडरचा दर झाला़ त्यानंतर जून महिन्यात ७२३ रुपये, जुलै महिन्यात ७८१़५० रुपये, आॅगस्ट महिन्यात ८१७ रुपये आणि आता सप्टेंबर महिन्यात ८४७़५० रुपये प्रति सिलिंडर झाले आहेत़ गॅस सिलिंडरच्या सततच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेल