शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोनपेठमध्ये शाळेतील टॉयलेटमध्ये चिमुकलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:57 IST

सोनपेठ शहरात ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार; पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद

- सुभाष सुरवसेसोनपेठ (जि. परभणी) : शहरातील एका इंग्रजी शाळेमध्ये बालवाडीत शिकणाऱ्या एका ५ वर्षीय मुलीवर शाळेतील स्वच्छतागृहात अत्याचार करण्यात आल्याची घटना ५ ऑक्टोबरला घडली होती. या प्रकरणी ७ ऑक्टोबरला सोनपेठ पोलिस ठाण्यात पोक्सो व इतर कलमांखाली आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे. बेलापूर आणि माजलगाव येथे शाळेतच चिमुकलीवर अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर आता शहरात देखील अशीच घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलगी सोनपेठ शहरातील एका इंग्रजी शाळेमध्ये बालवाडीत शिकण्यास आहे. ५ ऑक्टोबरला सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी आली. यावेळी मुलीला सरळ बसता येत नव्हते. आईने चौकशी केल्यावर पीडितेच्या अंगावर ओरखडल्याचे दिसून आले. त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलीवर अत्याचार झाल्याचे पुढे आले. 

त्यानंतर संबंधित मुलीच्या आईने थेट सोनपेठ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील, पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड आदींनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सबंधित घटनेची सत्यता तपासणी करण्यासाठी वेगवेगळे ६ पथक तयार करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणparabhaniपरभणी