शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पालम तालुक्यात १३ ठिकाणांहून होतोय अवैध वाळू उपसा;माफियांपुढे प्रशासनही हतबल;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 19:17 IST

पालम  तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातून १३ ठिकाणाहून वाळूचा वारेमाप अवैैध उपसा होत आहे.

ठळक मुद्देस्थानिक प्रशासनालाही माफिया जुमानत नसल्याने यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

परभणी : पालम  तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातून १३ ठिकाणाहून वाळूचा वारेमाप अवैैध उपसा होत आहे. स्थानिक प्रशासनालाही माफिया जुमानत नसल्याने यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यातून प्रशासनाचा महसूल मात्र बुडत आहे.

पालम तालुक्यात सावंगी भूजबळ ते दुटकापर्यंत गोदावरी नदीचे पात्र आहे.  या नदीपात्रावर राहटी, दुटका, गुंज, पिंपळगाव, बरबडी, फरकंडा, आरखेड, उमरथडी, रावराजूर, धनेवाडी, सावंगी बुु. असे १३ वाळूचे घाट लिलावासाठी प्रस्तावित करण्यात आले होते; परंतु, यातील केवळ पिंपळगाव मु. व सावंगी थडी अशा दोनच घाटांचा लिलाव झाला आहे. या घाटातून सप्टेंबर २०१८ पर्यंत वाळू उपसा करण्याची मुदत देण्यात आली आहे. तालुक्यामध्ये १३ ठिकाणी वाळूचे घाट असताना केवळ दोनच घाटाचा लिलाव झाला आहे. या घाटावरुन अधिकृत उपसा होत असला तरी इतर घाटांवरुन मात्र वाळूचा वारेमाप उपसा होत आहे.

डिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठाही कमी होत असल्याने वाळू उघडी पडत आहे. माफियांनी या घाटाकडेही मोर्चा वळविला असून यातूनही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करुन परजिल्ह्यात साठे तयार केले जात आहेत. रावराजूर येथून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने महसूल यंत्रणेने दोन तराफे जाळून टाकत २०० ब्रास वाळू तहसीलमध्ये उचलून नेली. यानंतर वाळू उपसा बंद होईल, असे वाटत होते; परंतु, कितीतरी पटीने वाळू उपसा होत आहे.

पारवा, राहटी, दुटका, पिंपळगाव मु. या परिसरात जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी कारवाईचा बडगाही उगारला होता. परंतु, जिल्हास्तरावरील अधिकारी परत गेल्यानंतर वाळूमाफिया पुन्हा उपसा करुन लाखो रुपयांचे वाळूसाठे तयार करीत आहेत. तालुक्यामध्ये मोठी कारवाई होत नसल्याने वाळू माफियांवर प्रशासनाचा वचक राहिला नाही.  बाहेर जिल्ह्यातील माफियांनी स्थानिकांच्या सहाय्याने वाळू उपस्याचा सपाटा लावला आहे. तहसीलदार तेजस्विनी जाधव यांनी कारवाईचा बडगा उगारला; मात्र त्यांना कर्मचाऱ्यांची साथ मिळत नाही. महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांशी वाळू तस्करांचे लागेबांधे असल्याने माफियांना कारवाईची कुणकुण  लागते. स्थानिकस्तरावर १३ गावात दक्षता पथकाची स्थापना झाली. परंतु, प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हे दक्षता पथकही कुचकामी ठरले आहे. 

वाळू साठ्यासाठी गायरान जमिनीचा वापरगोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन माफिया शेतामध्ये ठिकठिकाणी वाळू साठे तयार करीत होते; परंतु, महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाळूमाफियांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाळू न साठवता गायरान जमिनीवर साठे तयार करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महसूल विभागाने जवळपास २ हजार २०० ब्रास वाळूसाठे जप्त केले होते. परंतु, वाळू माफियांनी यावरही डल्ला मारत वाळूसाठे लांबविले आहेत. वाळूसाठे चोरीला जावूनही तहसील कार्यालयाने अद्यापही सातबारावर बोजा टाकला नाही. तसेच वाळू चोरट्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळे या विषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

खुलेआम होते वाहतूकस्थानिक प्रशासनाच्या वतीने ठोस कारवाई होत नसल्याने तालुक्यातील वाळू माफियांसह परजिल्ह्यातील माफियांनीही वाळू उपसा करण्यासाठी पालम तालुक्याकडे मोर्चा वळविला आहे. गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा करुन परजिल्ह्यात साठे केले जात आहेत. लातूर, अहमदपूर, लोहा, कंधार  आदी भागात चार ब्रासच्या टिप्परला १८ ते २० हजार रुपये मिळत असल्याने वाळू माफियांनी परजिल्ह्यात साठे केले आहेत. तालुक्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाळू वाहतूक होत असताना स्थानिक प्रशासनाला मात्र ही वाहने कशी काय दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्रंदिवस वाहतूक होत असताना कारवाई मात्र होत नाही.

टॅग्स :sandवाळूParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीCrimeगुन्हा