शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या लेकराला काठी बी लागली तर महाराष्ट्रातील रस्ते बंद पडतील: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:40 IST

परभणीत मनोज जरांगे साधताहेत मराठा समाजाशी संवाद

परभणी : आम्ही आमच्या लेकरांसाठी आरक्षण मागतोय. २७ तारखेला मराठे मुंबईकडे निघणार आहेत. २९ रोजी मुंबईत समुद्रासारखी ताकद दाखवू. आमच्या लेकराला काठी लागली तर महाराष्ट्रातील सगळे रस्ते बंद पडतील, असा इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी दिला.

परभणी जिल्ह्यात संवाद यात्रेनिमित्त ते दाखल झाले आहेत. त्यांनी विविध ठिकाणी गाठीभेटी बैठका घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकार दंगल घडवून आणणार असेल तरी आम्ही तसे होऊच देणार नाही. मुंबईत पण जाणार आहे. अतिशय शांततेत तेथे जाणार आहोत. आम्हाला मुंबईत आमच्या मागण्यांसाठी जाण्याचा अधिकार आहे. आता मराठे खवळून उठले. सरकारने मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला; पण समाज सोबत असल्याने मी भीत नाही. २७ ऑगस्टला आम्ही अंतरवालीतून निघतो. २९ रोजी आम्हाला मुंबईत जर त्रास दिला. काठी बी जरी लावली तर महाराष्ट्रातील एकही रस्ता चालू द्यायचा नाही. यावेळी आमचा लढा यशस्वी होईल. आरक्षणाचा गुलाल उधळूनच परत येणार असल्याचे जरांगे यांनी ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

हाकेंना मोजीत नाहीबीड जाळले. आता मुंबई जाळायची का? असे लक्ष्मण हाके म्हणाल्याबाबत विचारल्यावर जरांगे म्हणाले, त्यांना मी मोजीत नसतो. महत्त्व कुणाला द्यायचे, कुणाला नाही द्यायचे ते माणसाला कळले पाहिजे. त्याने स्वतःच्या जातीचे बघावे, किती हाल आहेत त्यांचे. त्यांच्या आरक्षणाचे बघावे, त्यांच्या आरक्षणासाठी भांडाव. मराठे, धनगर ओबीसीमध्ये वाद होतील, असे वागू नये.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण