शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींची ओवाळणी वाढवणार: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 19:28 IST

पाथरी मतदारसंघासाठी 4 हजार कोटी देण्याचे अजित पवार यांचे आश्वासन

मानवत: राज्यात महायुतीचे सरकार आल्यास अर्थसंकल्पात अधिकची तरतूद करून  लाडक्या बहिणीची ओवाळणी वाढवणार तसेच पाथरी मतदार संघासाठी 4 हजार  कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारात 13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विजयी  संकल्प सभेत ते बोलत होते.

शहरातील वालीबा मळा परिसरातील मैदानावर झालेल्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी खासदार सुरेश जाधव, डॉ अंकुश लाड, पंकज आंबेगावकर, प्रताप देशमुख, एकनाथ साळवे, विलास बाबर, भावना नखाते, व्यंकटराव शिंदे, डॉ उमेश देशमुख, सुरेश भुमरे, दादासाहेब टेंगसे, किशोर ढगे यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, विरोधकांनी लाडकी बहिण योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. तिजोरीवर बोजा वाढेल असे अफवा पसरून महायुती सरकारची बदनामी केली. मात्र खोट्या आरोपांना खोडून काढत सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात तिच्या हक्काचे पैसे जमा केले. दिवसभर राब राबणाऱ्या कष्टकरी महिलांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळत असताना विरोधकांच्या पोटात गोळा उठत असल्याचे  सांगितले.

लाडक्या बहिणी बरोबरच अल्पसंख्यांक समाज, अनुसूचित जातीजमाती प्रवर्गासाठी महायुती सरकारने  विविध योजना राबवल्या अल्पसंख्यांक समाजासाठी महायुती सरकारने एक हजार कोटीची तरतूद केली, मौलाना आझाद महामंडळाची 500 कोटी पर्यंत मर्यादा वाढवली दफनभूमी उर्दू शाळा शादी खाना यासाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचे पवार यांनी सांगितले. केंद्रातील तसेच राज्यातील महायुती सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली. लाडक्या बहिणी सोबतच लाडक्या भावांसाठी विविध योजना सुरू केल्या तीन गॅस सिलेंडर मोफत  दिल्याचे सांगितले.या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सांगताना दहा टक्के जागा मुस्लिम समाजासाठी  साडेबारा टक्के जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 12:30% अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि साडेबारा टक्के जागा महिला  उमेदवार दिल्याचे त्यांनी सांगितले. जातीपाती तेढ न करता सर्वांनी एक दिलाने राहावे अशी भूमिका  अजित पवार यांनी मांडली. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्यात येणार असल्याचे   खोटे नरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल केल्याचे टीका अजित पवार यांनी विरोधकावर केली. या सभेत दादासाहेब टेंगसे, संजयराव रनेर यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला.

महायुतीचे सरकार आल्यास पाथरी मतदारसंघासाठी 4 हजार  कोटी देणार संत साईबाबा यांच्या या जन्मभूमीच्या विकास आराखड्याकरीता आपण अर्थमंत्री या नात्यातून पैसा देवू. पाथरीचा कायापालट करु, तीर्थक्षेत्र नृसिंह पोखर्णीस पर्यटनाचा दर्जा देवू, तसेच पैठणच्या जलाशयातून लाभ क्षेत्रापासून कोसोदूर राहणार्‍या 54 गावांना सिंचनाकरीता पाणी उपलब्ध करुन देवू, गोदावरी नदीवरील बंधार्‍याच्या पाण्यातून पिण्यासह सिंचनाचे प्रश्‍न मिटवू, तसेच पाथरी मतदारसंघांतर्गत रस्ते, भूमिगत गटारे व अन्य विकास कामे मार्गी लावू, यासाठी राज्यात पुन्हा पाथरी मतदारसंघासाठी चार हजार कोटीचा विकास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले . यासाठी राजेश विटेकर यांना विजयी करण्याचे आव्हान यावेळी  त्यांनी केले 

विद्यमान आमदारांना निधी आणता आला नाही   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघात झालेल्या रस्त्यांच्या झालेल्या अवस्थेवर बोट ठेवत याला विद्यमान आमदार जबाबदार असल्याचे सांगितले. त्यांना मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, भेट देण्यासाठी वेळ मिळत नसतो. अडीच वर्ष सत्ता असतानाही आमदाराला काम करता आले नाही. निधी आणता आला नाही अशी टीका आ. वरपूडकर यांचे नाव न घेता केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकpathri-acपाथरीAjit Pawarअजित पवार