अबब किती हे धाडस ! पाथरीत गुटख्याची खुलेआम विक्री; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ६ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 11:58 AM2021-07-30T11:58:19+5:302021-07-30T11:59:02+5:30

राज्यात विक्रीस प्रतिबंध असणाऱ्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याची माहिती पाथरी पोलिसांना मिळाली.

How dare ! Open sale of gutkha in Pathari; Property worth Rs 25 lakh seized, 6 arrested | अबब किती हे धाडस ! पाथरीत गुटख्याची खुलेआम विक्री; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ६ जण ताब्यात

अबब किती हे धाडस ! पाथरीत गुटख्याची खुलेआम विक्री; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ६ जण ताब्यात

Next

पाथरी ( परभणी ) : पाथरी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे ( दि. ३० ) शहरासह तालुक्यात दोन ठिकाणी धाड टाकत अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला गुटखा पकडला. यावेळी पोलिसांनी २५ लाखांचा मुदेमाल जप्त केला आहे. तर ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

राज्यात विक्रीस प्रतिबंध असणाऱ्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याची माहिती पाथरी पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे तीन ठिकाणी कारवाई केली. पहिली कारवाई पाथरी येथील शासकीय विश्रामगृह परिसर, दुसरी कारवाई हादगाव ( बु ) येथील बाबा नखाते यांचा आखाडा तर  तिसरी कारवाई ढालेगाव येथील एका हॉटेल समोर करण्यात आली. पोलिसांनी एका चारचाकीसह अन्य ३ वाहने, मोबाईल आणि गुटखा असा २५ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

ही कारवाई स्थानिक पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड, पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तूरनर, पोलीस नायक परमेश्वर थोरे, पोलीस नायक शाम काळे, पोलीस नायक महेश गाजभर आणि पोलीस कॉन्स्टेबल मुस्तफा सयद  यांच्या पथकाने केली.

Web Title: How dare ! Open sale of gutkha in Pathari; Property worth Rs 25 lakh seized, 6 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.