शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

HHC Exam:चक्क्, इंग्रजीचा पेपर फोडून शिक्षकांनीच पुरविल्या कॉपी, ६ शिक्षकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:05 IST

याप्रकरणी सहा शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

- सूभाष सुरवसे सोनपेठ ( परभणी) : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला बुधवारी पहिल्याच दिवशी सोनपेठच्या महालिंगेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना पेपरच्या कॉप्या पुरविण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून काही शिक्षक त्याच्या कॉप्या बनवत असताना आढळले. त्या सहा शिक्षकां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनपेठ येथील पोलीस ठाण्यामध्ये सदरील प्रकरणातील शिक्षकांना बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. महालिंगेश्वर विद्यालयाच्या शेजारी मुंढे कॉलनीमध्ये पंचासमक्ष पथकाने पाहणी केली असता विद्यालयाचे शिक्षक बालाजी किशनराव बूलबूले, गणेश अंकुशराव जयंतपाळ, भास्कर बापूराव तिरमले हे त्यांच्या मोबाईलवर इंग्रजीचा पेपर घेऊन मुलांना कॉपी पुरविण्याकरिता कॉपी तयार करताना मिळून आले. त्यावरून सोनपेठचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे यांनी चौकशी केली असता शिक्षक रमेश मारुती शिंदे, सिद्धार्थ सावजी सोनाळे यांच्या मोबाईलवरून पेपर पाठविला असल्याचे निदर्शनास आले तसेच उपकेंद्र संचालक कालिदास रामकृष्ण कुलकर्णी यांनी पेपरच्या कॉप्या पुरविणे कामी मदत केल्याचे निदर्शनास आले.

केंद्र संचालकांनी दिली फिर्याद सोनपेठ पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेत शिक्षण विभागाला व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी कळविले. त्यावरून गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण यांनी केंद्र संचालक लहाने यांना आदेशित केले. त्यावरून केंद्र संचालक गोविंद लहाने यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून सोनपेठ ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोनपेठ ठाण्यात महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ५, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, अंमलदार भगवान मुंडे, भगवान पवार, दिलीप निलपत्रेवार, नारायण लटपटे, कुंडलिक वंजारे, मनोज राठोड, संजय रासवे, शिवाजी जाधव यांनी केली.

टॅग्स :examपरीक्षाparabhaniपरभणीEducationशिक्षण