शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

'हॅलो,आमदार बोलतोय'; बदलीसाठी शिक्षकाचा माजी आमदारांच्या नावाने शिक्षणाधिकाऱ्यांना फोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 19:32 IST

शिक्षकाचा प्रताप, दोन माजी आमदारांच्या नावे अधिकाऱ्यांना फोन करून अधिकाराबाहेर काम करण्यासाठी दबाव

मानवत ( परभणी) : येथील एका शिक्षकाने स्वतःला कधी माजी आमदार कपिल पाटील तर कधी त्यांचा पी.ए. असल्याचे सांगून प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या अधिकाराबाहेर काम करण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील साईनाथ पोलास यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी संबंधित शिक्षक दत्ता होगे यांच्या विरोधात 17 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांना मोबाईल क्रमांक 7083405248 वरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने, 'मी आमदार कपिल पाटील बोलतो', असे सांगून, "जिल्हा परिषदेच्या शिक्षिका श्रीमती मुंसाडे यांच्या प्रतिनियुक्तीची फाईल तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे पाठवा," असा आदेश दिला. शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत आपल्याकडे अधिकार नसल्याचे सांगितले. त्यावर फोन करणाऱ्याने, "मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे, फाईल लगेच त्यांच्या कार्यालयात पोचवा," असे सांगितले. त्यानुसार फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवण्यात आली. यानंतर, मोबाईल क्रमांक 7507090333 वरून पुन्हा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला आमदार कपिल पाटील असल्याचे सांगत, "जिल्हा परिषद प्रशाला, मानवत येथील मुख्याध्यापक छाया गायकवाड यांचा पदभार इतर व्यक्तीला द्या," असे धमकीवजा शब्दांत सांगितले. 

दिशाभूल केल्याचे उघडकीसप्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर समजले की, प्रतिनियुक्ती फाईल आणि मुख्याध्यापक बदली प्रकरणी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नव्हती. शिक्षणाधिकाऱ्यांनी मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला असता, तो दत्ता होगे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शिक्षक होगे यांनी आमदार कपिल पाटील यांचे नाव वापरून खोटे बोलून दबाव टाकल्याचा प्रकार उघड झाला. यावरून प्राथमिक शिक्षणाधिकारी पोलास यांनी तक्रार दाखल केली आणि शिक्षक दत्ता होगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी एका माजी आमदाराच्या नावानेही फोन  छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनाही पाथरीचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नावाने फोन करण्यात आला होता. फोनवरून, "शिक्षक दत्ता होगे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याचा वस्तुस्थिती शोधा," असा संदेश देण्यात आला. शिक्षण उपसंचालकांनी संशय बळावल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्क्रीनशॉट मागवला. तपासादरम्यान, हा फोनसुद्धा शिक्षक दत्ता होगे यांच्याच मोबाईल क्रमांकावरून करण्यात आल्याचे उघड झाले. दत्ता होगे यांनी आमदार कपिल पाटील आणि माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नावाने दिशाभूल करून चुकीचे काम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षक