ग्रामपंचायतीचे सदस्य गेले सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:04+5:302021-02-05T06:03:04+5:30

गंगाखेड तालुक्यातील ८४ पैकी ७० ग्रामपंचायतीची निवडणूक व सरपंच आरक्षण सोडत नुकतीच संपन्न झाली. निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांची ...

Gram Panchayat members went on a trip | ग्रामपंचायतीचे सदस्य गेले सहलीवर

ग्रामपंचायतीचे सदस्य गेले सहलीवर

गंगाखेड तालुक्यातील ८४ पैकी ७० ग्रामपंचायतीची निवडणूक व सरपंच आरक्षण सोडत नुकतीच संपन्न झाली. निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी यादी जाहीर केल्यानंतर ८ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या निवडी जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ३० जानेवारी रोजी काढले. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल लागले असून, अनेक ठिकाणी एकाच पॅनलने सर्वच्या सर्व जागा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या राणीसावरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभागापुरते मर्यादित पॅनल तयार करण्यात आले. वेगवेगळ्या पद्धतीने निवडून आलेल्या १७ सदस्यांपैकी एका विचाराने एकत्र आलेले १२ सदस्य विरोधकांच्या आमिषाला कंटाळून अज्ञातस्थळी निघून गेल्याचे व सरपंच निवडीच्या दिवशीच ते राणीसावरगावात परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचप्रमाणे काठावरील बहुमत मिळालेल्या कोद्री, सुप्पा ज., वागदरी, दुस्सलगाव तसेच खळी येथील पॅनल प्रमुखांनी आपल्या गटातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य फुटू नयेत याची काळजी घेत सदस्यांना सहलीवर पाठविले असल्याचे समोर आले आहे. दुस्सलगाव ग्रामपंचायतीत काठावर बहुमत मिळालेल्या पॅनलचाच सदस्य विरोधकांसोबत गेल्याचे समजते. बहुतांश ग्रामपंचायतीत तर महिला सदस्य निवडून आलेल्या असताना सुद्धा या महिला सदस्यांना डावलून पुरुष मंडळीच सहलीला गेल्याचे चित्र तालुक्यातील गावागावांत पहावयास मिळत आहे.

Web Title: Gram Panchayat members went on a trip