जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी स्वखर्चातून ५० जंबो ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले. हे सिलिंडर जिल्हा शासकीय रुग्णालयाला मोफत देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, अस्थिरोग तज्ञ डॉ. अमोल चौधरी, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, गौतम मुंडे, जयवंत सोनवणे, सुधीर कांबळे, आकाश लहाने, अमोल धाडवे, भाग्यश्री मुरारी, कल्पना सोनवणे, स्वप्निल कुलकर्णी, संदीप गायकवाड आदींची उपस्थिती होती. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी कोरोनाची निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन केेलेली मदत गौरवास्पद आहे. प्रत्येकाने अशा कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महेश वडदकर यांनी केले. कोरोनाच्या संकटकाळात शासन, प्रशासनही जनतेसाठी तत्पर आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ५० जम्बो सिलिंडर उपलब्ध करून दिले. यापुढेही रुग्णांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी सांगितले. गौतम मुंडे यांनी सत्रसंचालन केले. यावेळी सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गौतम मुंडे, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश लहाने, सुधीर कांबळे यांचाही रुग्णालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालयाला दिले ५० जंबो ऑक्सिजन सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:13 IST