लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिकवणीला जाणाºया एका १४ वर्षीय विद्यार्थिनीची छेडछाड काढल्या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरूद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- शहरातील साईबाबानगर भागातील रहिवासी असलेली एक विद्यार्थिनी गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास अंबिकानगर भागातील शिकवणी वर्गासाठी जात असताना दोन अल्पवयीन आरोपींनी या विद्यार्थिनीचा पाठलाग केला़ शिकवणी वर्गाजवळ सदरील विद्यार्थिनीला थांबवून विद्यार्थिनीची छेडछाड केली़ ही बाब सदरील विद्यार्थिनीने शिकवणी वर्गातील शिक्षिकेला सांगितली़ त्यानंतर सदरील शिक्षकेने या आरोपींना समजवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही या दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली़ त्यानंतर दोघेही मोटारसायकलवरून पळून गेले़ या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल हे करीत आहेत़
परभणीत शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:12 IST