रस्त्याच्या दुतर्फा वाढले अतिक्रमण
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले असून, वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे बाजारपेठ भागातील वाहतूक सातत्याने विस्कळीत होते. त्यातच अनेक वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहने चालवितात. त्यामुळेही समस्या वाढत आहे. तेव्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी त्याचप्रमाणे मनपाने रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी होत आहे.
स्टेडियम भागात घंटागाडी फिरकेना
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात मागच्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी आली नसल्याने व्यापाऱ्यांकडे कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. मनपाचे घंटागाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी घंटागाडी नियमितपणे फिरविली जात होती. त्यामुळे शहर स्वच्छतेची कामेही प्राधान्याने केली जात होती. मात्र, घंटागाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले असून, त्याचा त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.