शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पोलीस भरतीत फसवणूक; भूकंपग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड, चौघांवर गुन्हा

By राजन मगरुळकर | Updated: May 19, 2023 13:41 IST

चार पैकी एक आरोपी लातूर येथे पोलीस दलात असून अंमलदार पदावर कार्यरत आहे

परभणी : पोलिसाची नोकरी मिळविण्यासाठी पोलीस भरती २०२१ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या एका उमेदवाराने भूकंपग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासकीय नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी परभणी शहरातील नवा मोंढा ठाण्यात सदर उमेदवारासह अन्य तीन आरोपीविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेची अधिक माहिती अशी, परभणी पोलीस दलाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर यांनी प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रकाश राठोड यांच्याकडे भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून उपाधीक्षक राठोड यांनी पोलिस अंमलदार राजकुमार जोशी यांना सदरील आदेश दिले. परभणी पोलीस भरतीत लातूर जिल्ह्यातील शेकापूरवाडी येथील तुकाराम तातेराव फफागिरे याची निवड भूकंपग्रस्त म्हणून झाली होती. भरती दरम्यान तुकाराम फफागिरे यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक यांनी लातूर जिल्ह्यातील मुदगड येथील तलाठी यांना पत्र देऊन भूकंपग्रस्त अनुसयाबाई मस्के यांच्याबद्दल माहिती मागविली. यात मुदगडचे तलाठी बालाजी आंबोटे यांनी भूकंप पुनर्वसनमध्ये अनुसयाबाई मस्के यांचे नाव आहे व ते वर्गवारीमध्ये सदर गाव आहे, अशी माहिती दिली. 

याचबरोबर अनुसयाबाई मस्के यांचा तुकाराम फफागिरे हा दत्तक मुलगा हा (मुदगड एकोजी, ता.निलंगा) येथील रहिवासी आहे का ? याबाबत ग्रामसेवकाकडे पत्र देऊन राठोड यांनी माहिती घेतली असता यात तुकाराम फफागिरे यांचे मतदार ओळखपत्र मुदगड येथील नसल्याने त्यांचे स्थानिक मतदार यादीत नाव नाही. तो तेथे राहत नाही, अशी माहिती तहसीलदार निलंगा यांना पत्रक देऊन भूकंपग्रस्त प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या संचिकेच्या छायांकित प्रती तहसीलदारांनी दिल्या. त्यामध्ये सन २०२३ मध्ये धार्मिक विधी करून अनुसयाबाई मस्के हिने तुकाराम तातेराव फफागिरे यास दत्तक घेतल्याचे नमूद आहे. परंतू, चौकशीमध्ये स्थानिक साक्षीदार हे धार्मिक विधी झाला नसल्याचे सांगतात.

ओळखत नसल्याची दिली माहितीभूकंपग्रस्त प्रमाणपत्र धारक अनुसयाबाई ज्ञानदेव मस्के (रा.मुदगड एकोजी) यांना विचारपूस केली असता त्यांनी मी तुकाराम तातेराव फफागिरे यास दत्तक पत्राद्वारे दत्तक घेतलेले नाही. २० वर्षापूर्वी धार्मिक विधी झालेलाच नव्हता. मी अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेऊन तुकाराम फपागिरे व त्याच्या नातेवाईकांनी खोटे दत्तक पत्र तयार केले व तहसीलदार निलंगा यांच्याकडून भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळविले. मी तुकाराम यास ओळखत नाही, तो माझ्यासोबत राहत नाही, असे महिलेने सांगितले.

खोटा बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूकचौकशी दरम्यान उघडकीस आलेल्या प्रकारातून आरोपी तुकाराम तातेराव फफागिरे, त्याचे वडील तातेराव तुकाराम फफागिरे, त्याची आई भारतबाई तातेराव फफागिरे (सर्व रा.शेकापूरवाडी, ता.उदगीर) व नागू उर्फ नागोराव शिवराम गायकवाड (रा.सावंगी देवेडी, ता. निलंगा या व अन्य अज्ञात इसमांनी शासनाच्या भूकंपग्रस्तांच्या कोट्यातून तुकाराम तातेराव फफागिरे यास शासकीय नोकरी मिळविण्याचा व मिळवून देण्याच्या गैर उद्देशाने शासनाची फसवणूक करण्याचा उद्देशाने दत्तकपत्र वगैरे असा खोटा बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चार आरोपींचा गुन्ह्यात समावेशयामध्ये तुकाराम तातेराव फफागिरे, तातेराव तुकाराम फफागिरे, नागू उर्फ नागोराव शिवराम गायकवाड, पवन नागू उर्फ नागोराव गायकवाड या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या चारही जणांना अटक करण्यात आली. यातील आरोपी तुकाराम तातेराव फफागिरे व पवन नागू उर्फ नागोराव गायकवाड या दोन आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. इतर दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

एक आरोपी लातूरला पोलीस अंमलदारया घटनेतील आरोपी पवन नागू उर्फ नागोराव गायकवाड हा लातूर जिल्ह्यात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसparabhaniपरभणी