पाथरी / मानवत : पहाटे चार वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चार जणांना अज्ञात वाहनाने उडवल्याची घटना पाथरी-पोखरणी रस्त्यावर केकरजवळा घडली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये केकरजवळा येथील पोलीस पाटील यांचा समावेश आहे
पाथरी-पोखरणी रस्त्यावर परभणीकडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मानवत तालुक्यातील केकरजवळा चार जणांना उडवले. चार ही जण गावातून राष्ट्रीय महामार्ग 222 वर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. उत्तमराव नामदेव लाडाने (52,पोलीस पाटील केकरजवळा),आत्माराम भीमराव लाडाने (42 ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर नंदकिशोर साहेबराव लाडाने (50), राधेश्याम रामभाऊ लाडाने ( 48 ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना परभणी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.