शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मदतीसाठी सरकारला भाग पाडू; भर पावसात छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू बांधावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 19:05 IST

छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वजूर येथे आले असता पाऊस सुरू झाला.

मानवत (परभणी) : तालुक्यातील रामे टाकळी, वझुर बुद्रुक शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची सोमवारी छत्रपती संभाजी राजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत तातडीची मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू, असे आश्वासन यावेळी नेत्यांनी शेतकऱ्यांना दिले.

तालुक्यात १ व २ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला. शिवाय सतत झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची सोमवारी छत्रपती संभाजी राजे, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांनी पाहणी केली. यावेळी पाथरी पोखर्णी रस्त्यावरील रामे टाकळी आणि वझुर बु. शिवारात नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकरी बांधवांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारला धारेवर धरणार असल्याचे नेते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, गजानन तुरे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोढे, विठ्ठल चौकट, नामदेव काळे, दत्तराव परांडे, अर्जुन काळे, गोपाळ काळे, रंजीत चव्हाण, संजय चौखट आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

भर पावसात केली पाहणी छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वजूर येथे आले असता पाऊस सुरू झाला. यावेळी भर पावसातच या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊसSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaju Shettyराजू शेट्टीBacchu Kaduबच्चू कडू