शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 15:36 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तरुणांचा सहभाग

- प्रशांत मुळीयेलदरी (जि. परभणी) : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश तातडीने लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. मात्र, शासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने मराठा समाजातील तरुणांनी पूर्णा प्रकल्पाच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयात बुधवारी जलसमाधी आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

राज्य शासन मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही, तोपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी सांगितले. जलसमाधी आंदोलनात जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील तरुण, महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने येलदरी जलाशयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, एनडीआरएफचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

शासनाने मराठा समाजाला नुसते आश्वासने न देता आधी आरक्षण द्यावे, नंतरच निवडणूक घ्यावी अन्यथा राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असा इशाराही यावेळी देत प्रशासनाला निवेदन सादर केले. साधारणपणे हे आंदोलन दीड ते दोन तास करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनMaratha Reservationमराठा आरक्षण