शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर; २४ तासात ५१.९९ मि.मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 20:31 IST

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही संततधार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे काही भागात पिकांना दिलासा मिळाला तर काही भागात नुकसानही झाले आहे.

परभणी: जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही संततधार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे काही भागात पिकांना दिलासा मिळाला तर काही भागात नुकसानही झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तब्बल ५१.९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

दोन दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली असून हा पाऊस प्रकल्पातील पाणीसाठ्याच्या वाढीसाठी पोषक ठरला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत परभणी तालुक्यामध्ये ५५.५०, पालम तालुक्यात ५५.६७, पूर्णा ६२.८०, गंगाखेड ५६.५०, सोनपेठ ५९, सेलू ४५.८०, पाथरी ६१, जिंतूर ३५ आणि मानवत तालुक्यात ४६ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात ५७ टक्के पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले. पूर्णा, दुधना, गोदावरी, थुना या नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. पालम, पूर्णा आणि जिंतूर तालुक्यात नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क काही तासांसाठी तुटला होता. दरम्यान, पावसामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.

ढालेगाव, मुद्गल, डिग्रस या बंधाऱ्यांबरोबर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातही पाणीसाठा वाढला आहे. संततधार पावसामुळे काही भागात पिकांना दिलासा मिळाला असला तरी नदीकाठच्या गावांमधील पिकांची नासाडी झाली आहे. शेत जमीन खरडल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

पावसाचा जोर : सात मंडळांमध्ये अतिवृष्टीजिल्ह्यात मंगळवारी देखील पावसाचा जोर कायम होता. संपूर्ण जिल्हाभरात सरासरी ५२ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील आठ मंडळांमध्ये जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यातील पिंगळी मंडळात ६५ मि.मी., पालम तालुक्यातील पालम मंडळात ६९ मि.मी., पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात ७१, ताडकळस ८४, सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात ८०, पाथरी तालुक्यात पाथरी मंडळात ७४ आणि हादगाव मंडळात ७७ मि.मी. पाऊस झाला. परभणी तालुक्यातील परभणी शहर मंडळात ५८, ग्रामीण मंडळात ५४, सिंगणापूर ६२, दैठणा ५५, झरी ५४, पेडगाव ४४ आणि जांब मंडळात ५२ मि.मी. पाऊस झाला.

राहटी बंधारा फुल्लपरभणी तालुक्यात होणाऱ्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून पूर्णा नदीवर उभारलेला बंधारा तुडूंब भरला आहे. विशेष म्हणजे, बंधाऱ्याचे गेट पाण्याखाली गेले असून पुलापासून साधारणत: १० फुटावरुन पाणी वाहत आहे. ३ दलघमी पाणीसाठवण क्षमता असलेला बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने परभणी शहरवासियांचा पाणीप्रश्न मिटला आहे

२७ मंडळे १०० टक्केजिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी २७ मंडळांमध्ये आॅगस्ट महिन्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. १० मंडळांमध्ये ७५ ते १०० टक्के आणि दोन मंडळांमध्ये ५० ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला.

ढालेगाव  बंधारा १०० टक्के भरला२० आॅगस्ट रोजी झालेल्या पावसाने २१ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता तालुक्यातील ढालेगाव येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता बंधाऱ्याचे एक गेट उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याची क्षमता १४.८७ दलघमी आहे. मागच्या आठवड्यात १७ आॅगस्ट रोजी पडलेल्या पावसाने बंधारा ७५ टक्के भरला. २० आॅगस्ट रोजी या भागात बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने २१ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता बंधारा पूर्णपणे भरला. पाण्याची आवक वाढत असल्याने मंगळवारी सकाळी ८ वाजता बंधाऱ्याचे एक गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

मुद्गल बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडलासोनपेठ तालुक्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पाथरी तालुक्यातील मुद्गल बंधारा ९० टक्के भरला आहे. २१ आॅगस्ट रोजी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोनपेठ शहरासह परिसरात १६ आॅगस्टपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुद्गल बंधारा २१ टक्के भरला होता. तर खडका बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साचले होते. दोन दिवसाच्या खंडानंतर २० आॅगस्टपासून पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने मुद्गल बंधारा ९० टक्के भरला. त्यामुळे सोनपेठ शहराचा पाणीप्रश्न मिटला. तसेच तालुक्यातील शेतकरीही दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने समाधानी आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीfloodपूरriverनदी